भारतात भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भाजीपाला पिक हे कमी कालावधीत तयार होणारे असते म्हणून याची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगलीच फायदेशीर ठरते. अशाच भाजीपाला पिकापैकी एक म्हणजे दोडक्याचे पिक. कुठल्याही पिकातून यशस्वी उत्पादन प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्वाची बाब असते ती त्या पिकाच्या सुधारित जातींची निवड करणे.
जर शेतकरी बांधवांनी दोडक्याच्या सुधारित जातींची लागवड केली तर त्यातून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते, आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा होईल. त्यामुळे आज कृषी जागरण आपल्या शेतकरी मित्रांसाठी दोडक्याच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन आले आहे. चला तर मग जाणुन घेऊया दोडक्याच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता.
दोडक्याच्या सुधारित जाती आणि त्यांची विशेषता
घिया दोडके
दोडक्याची हि एक सुधारित जात आहे. या जातीचे दोडके हे चांगले हिरवे असतात. दोडक्याच्या या जातीची भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, आणि या जातीची लागवड करून शेतकरी चांगली कमाई देखील करत आहेत. शेतकरी मित्रांनो या जातीच्या दोडक्याची साल हि पातळ असते. दोडक्याच्या या जातीमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण चांगले मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे याचे सेवन आरोग्यासाठी चांगले सांगितले जाते.
पुसा नसदार
दोडक्याची हि एक सुधारित जात आहे. या जातीचे दोडके हे हलके हिरवे असतात. या जातीच्या दोडक्याच्या सालीवर फुगलेल्या नसासारखा आकार असतो. या जातीचा आतील भाग पांढरा आणि हिरव्या रंगाचा असतो. तसेच या जातींचे दोडके हे 12-20 सें.मी. लांब असते. दोडक्याच्या या जातीचे उत्पादन हे चांगले लक्षणीय आहे. या जातीपासून 70-80 क्विंटल प्रति एकरपर्यंत उत्पादन मिळू शकते.
सरपुटिया
दोडक्याची हि देखील एक सुधारित वाण आहे. या जातीची दोडके वेलीवर गुच्छांमध्ये लागतात. या जातीच्या दोडक्याचा लांबी हि इतर जातीपेक्षा लहान असते.
या जातीच्या दोडक्यावर उंच पट्टे आढळतात. या जातीच्या दोडक्याची साल हि इतर जातीच्या दोडक्यापेक्षा अधिक जाड आणि मजबूत असते. दोडक्याची या जातीची लागवड जास्त करून मैदानी भागात आपल्याला अधिक पाहवयास मिळेल.
P K M 1
दोडक्याच्या सुधारित जातीपैकी एक जात म्हणजे PKM1 हि एक जात. या जातीची दोडके हे चवीला चांगले चविष्ट असल्याचे सांगितले जाते. ह्या जातीचे दोडके हे दिसायला खुपच सुंदर असतात हे प्रामुख्याने गडद हिरव्या रंगाचे असतात. दोडक्याच्या या जातीपासून 280-300 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळू शकते. दोडक्याची हि जात 160 दिवसात काढणीसाठी तयार होते. या जातींचे दोडके हे पातळ, लांब, पट्टेदार आणि दिसायला किंचित वाकलेले असते.
Published on: 15 November 2021, 09:18 IST