सध्या उन्हाळा सुरू झाला असून अंगाचा तिळपापड करणार ऊन सध्या पडत आहे. पिकांच्या लागवडीबाबत विचार केला तरउन्हाळ्यात पिकांचे काळजी घेणे देखील खूपच आवश्यक आणि तेवढेच जिकिरीचे देखील असते.
त्यातल्या त्यात भाजीपाला लागवड म्हटले म्हणजे जरा एवढ्या तापमानात लागवड करून यशस्वी करणे म्हणजे खूपचकौशल्य लागते. आपल्याकडे उन्हाळी हंगामामध्ये भेंडी, गवार, मिरची, पोकळा, घेवडा, काकडी, कलिंगड आणि टरबूज सारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. परंतु उन्हाळ्यामध्ये यांचे व्यवस्थापन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या लेखात आपणथोडक्यात जाणून घेऊ.
नक्की वाचा:शेतकरी आत्महत्यांनी जळगाव जिल्हा हादरला; दोन दिवसात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
उन्हाळी हंगामातील भाजीपाला व्यवस्थापन
1- उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला लागवड करायचे असेल तरजमिनीची निवड फार कौशल्यपूर्ण करावी लागते. यामध्ये सेंद्रिय कर्ब व पाणी साठवून ठेवणारी, पाण्याचा उत्तम प्रकारे निचरा होणारी असावी.
2- मल्चिंग सारखे आच्छादनाचा वापर करणे खूपच गरजेचे असते म्हणजे पाण्याचे बाष्पीभवनहोतं नाही.
3- ज्या ठिकाणी भाजीपाला लागवड केली असेल अशा शेताच्या सभोवताली शेवरी सारखे अथवा मक्या सारखे पीक लावावे जेणेकरून भाजीपाल्याचे कोरडे व उष्ण वारे यापासून संरक्षण होईल.
4- जातींची निवड करताना ती रोगांना प्रतिकारक अशा जातींचे करावीव त्यासोबत सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन ठेवावे.
5-भाजीपाला तोडणी करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
6-स्वच्छ ठिकाणी प्रतवारी व पॅकिंग करावे तसेच भाजीपाल्याची साठवण व मालवाहतूक पहाटेच्या वेळी करावी.
भेंडी व गवार ची काळजी अशी घ्यावी
उन्हाळ्यामध्ये या दोन्ही प्रकारच्या भाज्यांना खूप मागणी असते. परंतु त्यांचे व्यवस्थापन व काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे देखील असते. भेंडी लागवडीसाठी रोगांना प्रतिकारक्षम आशा परभणी क्रांती, अर्का अनामिका, पुसा सावनी कधी जातींची लागवड करावी व तसेच गवार लावायचे असेल तर पुसा सदाबहार,पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी.
वेलवर्गीय भाजीपाला पिके
वेलवर्गीय भाजीपाला मध्ये उन्हाळ्यात काकडी,कारली व दुधी भोपळा,दोडका घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेशआहे.
उन्हाळ्यामध्ये या भाज्यांची लागवड रुंदअंतर ठेवून बिया लावून केली जाते.जेव्हा रोपांची उगवण होते तेव्हा वेलींना वळण व आधार देणे ही कामे महत्त्वाचे आहे. तसेच वेलींना आधारवदर्जेदार उत्पादनासाठी मंडप व तारेचा आधार द्यावा.
मिरची, वांगी आणि टोमॅटो
या तीनही भाजीपाला पिकांची लागवड गादीवाफ्यावर करावी.डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणारेकिडींच्या नियंत्रणासाठी दक्ष राहावे.मिरची त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.मिरचीची लागवड करताना मिरची मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल अशा पद्धतीने केले तर भाव नक्कीच मिळतो.मिरचीची लागवड करायची असेल तर जातीची निवड करतानाउंच वाढणारी व शाखीय वाढ असणारी, कांदा जास्त असणारी तसेच पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्यांचा असावा.
वांगी पिकासाठी उंच व डेरेदार वाड असणारा काटेरी देठ, जांभळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चकाकी दार गोल किंवा उभट गोल फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्याची तोडणी पाच-सहा दिवसांनी करावी व संध्याकाळी करावी. उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाण्याचा पुरवठा करावा.
Published on: 27 March 2022, 01:05 IST