Agripedia

भात पिकावर मुख्यतः तीन प्रकारचा करपा रोग येतो. १.करपा(ब्लास्ट),२.कडा करपा आणि ३.पर्ण करपा.

Updated on 28 September, 2021 4:39 PM IST

यांमधील करपा(ब्लास्ट) आणि पर्ण करपा हे बुरशीजन्य तर कडा करपा जिवाणूमुळे उद्भवतो. म्हणूनच कोणत्याही रोगाच्या योग्य नियंत्रणासाठी पाहिल्यांदा रोग ओळखले महत्वाचे आहे. पिकावर येणाऱ्या रोगांची आधीपासूनच ओळख असेल तर प्रतिबंधक व नियंत्रण उपाय चांगल्या पद्धतीने राबवू शकतो.

1)करपा(ब्लास्ट):-कारक बुरशी:- Pyricularia orazyae

 लक्षणे :-

 या रोगाचा प्रादुर्भाव अगदी पिकाच्या कोणत्याही अवस्थेत पान, खोड व लोंबीच्या मानेवर होऊ शकतो. पानावर लंबगोलाकार म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते होत जातात,असे पानांवर असंख्य ठिपके पडतात.

 ठिपक्यांचा मध्य राखाडी रंगाचा व कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात. ठिपक्यांचा आकार आणि रंग यावरून हा रोग ताबडतोब ओळखता येतो.

 रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने मोठ्या प्रमाणावर करपतात. पानाप्रमाणेच पेये आणि लोंबीच्या दांड्यावर सुद्धा रोग येतो, त्यामुळे रोगट ठिकाणी पेये आणि मान मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत.

 

रोगाची लागण व प्रसार:-

या रोगाचे प्रमाण भातामध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी शेतात पाणी साठवून ठेवले जात नाही तेथे जास्त असते.

त्याचप्रमाणे खाचऱ्यामधील पाणी अतिबकमी झाल्यास सुद्धा रोगाचे प्रमाण वाढते. 

 रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा रोगट बियाणाद्वारे व शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. 

जास्त काळ पानांवर दवं साठणे,आद्र्रता 90 ते 92% वर जाने,नत्र खतांचा अति वापर,अधून-मधून हलका पाऊस,कमी सूर्यप्रकाश व दाट लागवड ही सुद्धा रोग लागण व प्रसारनाची महत्वाची कारणे आहेत.

2)कडा करपा:-

कारक जिवाणु: Xanthomonos orazyae 

लक्षणे:-प्रादुर्भाव साधारणतः फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात होतो. जास्त पावसाच्या प्रदेशात, उदा. कोकणामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात येतो.

 या रोगामुळे भात पानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात. करपलेल्या भागाचा रंग फिकट तपकिरी असतो आणि हिरव्या भागाला लागून असलेल्या कडा सरळ नसून वेड्यावाकड्या होतात. 

रोगग्रस्त पान दोन बोटात धरुन ओढले असता त्याचा स्पर्श खडबडीत लागतो पण इतर दोन्ही बुरशीजन्य रोगांचा स्पर्श असा खडबडीत लागत नाही.

रोगाची लागण व प्रसार:-

या रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे व शेतामधील प्रसार पाणी आणि पावसाच्या थेंबामार्फत होतो. 

रोगाच्या वाढीसाठी साधारणतः मध्यम उष्ण हवामान (25 ते 340 सें तापमान) आणि जास्त आर्द्रतेची (70% पेक्षा जास्त) आवश्यकता असते.

 

3)पर्ण करपा:-

कारक बुरशी:- Rincosporium orazyae

लक्षणे:-

लागवड झाल्यानंतर साधारणत: 30 ते 40 दिवसांनी या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव जवळ जवळ संपूर्ण पीक कालावधीमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. 

सुरवातीला पानाचे टोक किंवा कडेवर अर्धवर्तुळाकार फिकट ठिपके येतात. हळूहळू ठिपके रुंद होत जाऊन तपकिरी होतात.

पर्णकरपा रोगामुळे मुख्यतः पानाचे शेंडे करपतात. परंतु कधी कधी मधील भाग सुद्धा करपलेला दिसतो. थोड्याच दिवसात करपलेला भात राखाडी रंगाचा दिसतो.

 

रोगाची लागण व प्रसार:- रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगट बियाणे तसेच शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो.हा  रोग करपा(ब्लास्ट) रोगाप्रमाणेच पसरतो.

 

प्रतिक येवले,नाशिक

औदुंबर जाधव,माळशिरस

 

English Summary: various diseases and their symptoms on the paddy crop
Published on: 28 September 2021, 04:39 IST