Agripedia

मागील काही वर्षात तुर या पिकात पाने पिवळे

Updated on 17 July, 2022 4:21 PM IST

मागील काही वर्षात तुर या पिकात पाने पिवळे पडून झाडे वाळणे जळणे उबळणे ही लक्षणे दिसून मोठ्या प्रमाणात तूर पिकाचे नुकसान होत असल्याचे आढळून येत आहे शेतकरी बंधूंनो ही जी लक्षणे सांगितली ती तूर पिकात दिवसेंदिवस का वाढत आहेत ?कोणत्या या रोगामुळे ती दिसतात? तसेच त्यासाठी करावयाच्या एकात्मिक व्यवस्थापन योजना याविषयी थोडं जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो तूर पिकात वर निर्देशित लक्षणे प्रामुख्याने खालील निर्देशित रोगांमुळे दिसून येताततुरीवरील मर रोग : शेतकरी बंधूंनो हा रोग फ्युजॅरियम उडम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पेरणीपासून सुमारे पाच ते सहा आठवड्यात तुरीच्या झाडावर मर रोगाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. भारी जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो .या रोगाची बुरशी तुरीच्या

रोपात घुसल्यानंतर हळूहळू झाडात वाढते व पाने पिवळसर पडतात किंवा शिरांमधील भाग हलका पिवळा किंवा गर्द पिवळा होतो. मूळ चिरले असता मुळाच्या आत मध्ये मध्यभागी हलक्या तपकिरी रंगाची रेघ दिसते .कधीकधी खोडावर पांढरी बुरशी सुद्धा आढळते. या रोगात झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमजतात. झाड बऱ्याच वेळा हिरव्या स्थितीत वाळते. मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्यभाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. या रोगामुळे शेतकऱ्याची बरीचशी झाडे वाळल्या मुळे तुरीच्या उत्पादनात घट येते.तुरीवरील मूळकुजव्या रोग : तुरीवरील मूळकुजव्या हा रोग Rhizoctonia bataticola किंवा Rhizoctonia solani या बुरशीमुळे होतो जमिनीचे तापमान 35 अंश से. किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास हा रोग तीव्रस्वरुपात आढळतो. तुरीची रोप चार ते पाच आठवड्याचे असताना या रोगाची लक्षणे दिसू लागतात. या रोगामध्ये रोपे कोमजतात,पाने वाळतात व गळून पडतात. रोगट मुळे पूर्णपणे कुजलेली असतात. झाड उपटून काढत असताना

तंतुमय मुळे जमीनीतच राहतात व फक्त सोटमूळ वर येते. सोटमुळावरील साल सोट मुळापासून अलग होते.कोलेतोट्रायकम करपा : हा रोग कोलेतोट्रायकम या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे तुरीची रोपे तीन ते चार आठवड्याची असताना दिसून येतात पानावर खोडावर व फांद्यावर काया करड्या रंगाचे ठिपके आढळतात. रोगट रोप वाळते व मरते पाऊस व हवेद्वारे या रोगाच्या बीजाणू चा प्रसार होतो तुरीवरील वांझ रोग किंवा स्टरीलिटी मोझाइक : हा विषाणूजन्य रोग असून या रोगात झाड झुडूपा सारखे वाढते व पानाचा रंग फिक्कट हिरवा दिसतो पानावर पिवळे गोलाकार ठिपके दिसतात. झाडावर अत्यंत कमी शेंगधारणा होते किंवा कधीकधी शेंगधारणा होत नाही या रोगाचा प्रसार ईरीयोफाईड कोळ्यांमुळे होतो.

शेतकरी बंधुंनो या रोगाची चर्चा आत्ता करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शेतकरी गांभीर्याने घेतात परंतु या रोगांवर नंतर उपाययोजना करणे म्हणजे डोक्याला जखम व पायाला मलम अशी गोष्ट घडू शकते.प्रतिबंधात्मक व एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केल्याशिवाय या समस्येवर व्यवस्थापन मिळत नाही .कृपया खालील निर्देशित उपायोजना यासंदर्भात नोंद घेऊन नियोजन करून पेरणीपूर्व काही बाबीचा तर पेरणीनंतर काही बगीचा अंगीकार करून प्रभावी व्यवस्थापन करा यातील बहुतांश रोग वरून फवारण्या करून दुरुस्त होण्याची शक्यता कमी असते म्हणून खालील उपाययोजनांची नोंद घेऊन त्यांचा अंगीकार करा.

 

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Valuable advice to farmers for death, barrenness, root rot or burning, wilting in tur crop
Published on: 17 July 2022, 04:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)