Agripedia

शेतीमधील उत्पादन खर्चाचा विचार केला तर हा प्रामुख्याने बियाणे, रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावर जास्त होतो. तसेच पिकांची लागवड ते काढणीपर्यंत होणारा मजुरीवर चा खर्च ही प्रामुख्याने महत्वाचा असतो. त्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सध्या काही बदल करणे आवश्यक आहेत.

Updated on 29 October, 2021 8:25 PM IST

 शेतीमधील उत्पादन खर्चाचा विचार केला तर हा प्रामुख्याने बियाणे, रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावर जास्त होतो. तसेच पिकांची लागवड ते काढणीपर्यंत होणारा मजुरीवर चा खर्च ही प्रामुख्याने महत्वाचा असतो. त्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सध्या काही बदल करणे आवश्यक आहेत.

सध्या पाहिले तर रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे. रासायनिक खतांचा वापर व त्यांच्यावर होणारा खर्च हा प्रामुख्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढवत असतो. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा विचार करून कृषी तज्ञांच्या सहाय्याने आणि परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे उत्पादन खर्च कमी करण्यासाठीच्या उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे. म्हणजेच रासायनिक खतांची कमतरता ही पिकांनाभासू नये आणि उत्पादन ही कमी होऊ नये या दोघांमधला सुवर्णमध्य साधणे फार गरजेचे आहे. या लेखात आपण रासायनिक खतांवर होणारा उत्पादन खर्च कमी करण्याच्या काही साध्या सोप्या पद्धतींचा विचार करू.

रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरू शकता या पद्धती

  • सगळ्यात अगोदर म्हणजे मातीपरीक्षण करून शिफारस केल्यानुसार रासायनिक खतांचा वापर करणे.
  • नीम कॉटेड युरिया चा वापर केल्याने पिकांना योग्य प्रमाणात नत्राचा पुरवठा होऊ शकतो व नत्राच्या कार्यक्षमतेत वाढ होते. त्यामुळे लागणाऱ्या नत्राच्या मात्रेत बचत होते.तसेच नीम कॉटेड युरिया मध्ये असलेल्या निंबोळी युक्त  घटकांमुळे कीडनियंत्रनासमदत होते
  • जमिनीतील स्फुरद मुक्त होण्यासाठी स्फुरद विरघळणारे जिवाणू म्हणजेच पीएसबी खतांचा वापर करावा.
  • रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी खत देण्याच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करावा. उदा. युरिया+ डीएपी ब्रिकेट, बियाणे व खत पेरणी यंत्राचा वापर इत्यादी.
  • कडधान्ये व तेलबिया पिकांमध्ये जर जैविक खतांचा वापर केला तर रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. तूर व हरभरा पिकांवर फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची द्रावण फवारावे.
  • शेतातील वाया जाणाऱ्या काडी कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करावे.
  • पिकांच्या उत्तम पोषणासाठी कमी खर्चात शेतावर तयार करता येतील अशी हिरवळीचे खते, नाडेप कंपोस्ट व बायोडायनामिक्सइत्यादींचा वापर
  • भाजीपाला पिकांमध्ये युरिया व डीएपी ब्रिकेटसवापर करावा. जेणेकरून पिकांना आवश्यकतेप्रमाणे नत्र व स्फुरदाची उपलब्धता होते.
  • शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्था असेल तर पाण्यात विरघळणाऱ्या तसेच द्रवरूप खतांचा वापर करणे चांगले असते. फवारणीच्या माध्यमातून रासायनिक खतांची मात्रा देणे हे जमिनीतून द्यायच्या खतांपेक्षा किफायतशीर असल्याने शिफारसी प्रमाणे फवारणीद्वारे खते द्यावी.
  • शून्य मशागत,पिकांची फेरपालट,जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, शेतातील काडीकचरा व पालापाचोळा शेतातच गाडणेआणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा वापर या बाबींचा अवलंब केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमीन सुपीक बनतात. परिणामी रासायनिक खतांची आवश्यकता कमी भासून खर्च कमी होतो.
English Summary: use this option for less expenditure of chemical fetilizer
Published on: 29 October 2021, 08:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)