Agripedia

जमीन जिवंत ठेवण्यासाठी उपयुक्त जिवाणूचे प्रमाण वाढले पाहिजे.

Updated on 26 July, 2022 2:29 PM IST

जमीन जिवंत ठेवण्यासाठी उपयुक्त जिवाणूचे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी त्यांचे खाद्य सेंद्रिय पदार्थ उपलब्ध केले पाहिजे, त्यातून जमिनीची सुपीकता, उत्पादकता शाश्वत बनण्यास मदत होईल. पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी सिंचन, पीक व्यवस्थापनावर भर दिला जात असला तरी अनेक वेळा जमिनीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष होते, माती परिक्षण न केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना जमिनीचे गुणधर्म आणि समस्या यांची माहिती नसते. तसेच जमीन ही त्यातील सूक्ष्मजीवांमुळे जिवंत असते, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध पसरतो. हा सुगंध सुप्तावस्थेमध्ये असलेल्या ॲक्टिनोमायसेट्स हे जीवाणू पाऊस पडताच क्रियाशील होत असल्यामुळे येतो. जमिनीत असे असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव जिवाणू असतात. ते वनस्पतींच्या वाढीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भूमिका पार पाडतात. 

त्यामुळे अशा उपयुक्त जिवाणूंनी परिपूर्ण जमिनीला जिवंत जमीन मानले जाते. या जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठेवणे हे शेतकऱ्याचे काम आहे. आजकाल रासायनिक खते, पाणी यांचा असंतुलित वापर होत आहे. तुलनेने सेंद्रिय जैविक खतांच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. हे सेंद्रिय पदार्थ जिवाणूंचे अन्न आहे, सेंद्रिय खते पुरेशा प्रमाणात वापरल्यास जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या निश्चित वाढू शकते, केवळ रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन काही काळ वाढले तरी शाश्वत उत्पादन मिळणार नाही. कारण रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच शंभर टक्के पर्याय होऊ शकत नाही.Chemical fertilizers can never be a hundred percent substitute for organic fertilizers. सेंद्रिय खतामध्ये सर्व प्रकारची अन्नद्रव्ये अल्प प्रमाणात असली तरी विविध विकरे (एन्झाईम्स), संप्रेरके (हार्मोन्स), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) मुबलक मिळतात. त्यामुळे त्यांचा वापर केल्यास पीक उत्पादनाचा दर्जा उदा. गोडी, रंग, रोग, कीड प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच जमिनीची जडणघडण, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीतील हवा आणि निचरा यामध्ये लक्षणीय सुधारणा होते.

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता यातील फरक[१] जमिनीची सुपीकता म्हणजे त्या जमिनीची पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता.[२] जमिनीची उत्पादकता म्हणजे जमिनीतून मिळालेले उत्पादन.जमिनीने फक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा केला तर अपेक्षित उत्पादन मिळेलच असे नाही. कारण चांगले उत्पादन मिळण्यासाठी पीक व्यवस्थापनाकडे (उदा. सिंचन, तणे, रोग आणि कीड नियंत्रण) लक्ष द्यावे लागते.सुपीकतेचे प्रकार[१] जैविक सुपीकता : जमिनीतील उपयोगी जिवाणूची संख्या[२] भौतिक सुपीकता : जमिनीची जलधारण शक्ती, जमिनीतील मोकळी हवा, निचरा इ.[३] रासायनिक सुपीकता सामू, क्षारांचे प्रमाण, पिकांसाठी उपलब्ध अन्नद्रव्ये इ.या तिन्ही सुपीकता योग्य प्रकारे जपल्यास पिकाचे उत्पादन आणि दर्जा चांगला मिळतो त्यात जैविक आणि भौतिक सुपीकता जपण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांची

उपलब्धता, सेंद्रिय खतांचा वापर हाच रामबाण उपाय आहे. खड्डयात सेंद्रिय खत तयार करताना मातीने झाकलेले असावे. तसेच सेंद्रिय खते शेतात वापरल्यानंतर मातीमध्ये मिसळून घ्यावीत. अन्यथा त्यातील नत्राचा ऱ्हास होतो, आपण रासायनिक खतामार्फत अन्नद्रव्ये दिली असली तरी ती पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम जिवाणू करतात. उदा. युरिया दिला तरी त्यातील नत्र जोपर्यंत नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर हे जीवाणू नायट्रेटमध्ये रूपांतरित करत नाहीत तोपर्यंत पिकाला घेता येत नाही, म्हणजेच जमीन जिवंत असली तरच पिकांना अन्नद्रव्ये मिळू शकतात.पिकांचे अवशेष, काडी कचरा, प्राण्याचे अवशेष यापासून तयार झालेल्या सर्व प्रकारच्या खतांचा समावेश सेंद्रिय खतांमध्ये होतो, त्याचे सेंद्रिय भरखते आणि सेंद्रिय जोरखते असे दोन प्रकार येतात.[१] भर खतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने वापर जास्त प्रमाणात करावा लागतो. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, प्रेसमड केकयुक्त खत इ.२]जोर खतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण तुलनेने जास्त असते. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इ.

पालापाचोळा, वनस्पतीचे अवशेष, शेण, लेंडी, प्राण्यांची विष्ठा यामध्ये तणांचे बी तसेच राहू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर न कुजवता केल्यास शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थात कर्बाचे प्रमाण जास्त आणि नत्राचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांचा कुजण्याचा वेग खूप कमी असतो. हे सेंद्रिय पदार्थ कुजवणाऱ्या जिवाणूंच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. हे जिवाणू जमिनीतील नत्र वापरतात. परिणामी पिकाला नत्र कमी पडू शकते. त्यामुळे पूर्ण कुजलेले सेंद्रिय खतच पिकाला वापरावे.लेखक - डॉ. प्रमोद जगताप,९४२२०७१२९३(डॉ.जगताप हे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे मृदाशास्त्रज्ञ आहेत. आणि डॉ.दुरगुडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदाशास्त्रज्ञ, तर डॉ. भाकरे हे मृदशास्त्र व कृषी रसायन विभागाचे प्रमुख आहेत.)

 

संकलन : प्रविण सरवदे, कराड

English Summary: Use these organic fertilizers and such for soil vitality
Published on: 26 July 2022, 02:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)