Agripedia

मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार पुरवणे आवश्यक असते. विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यातून जास्त खते परिणामकारकरित्या देणे शक्य होते. त्यामुळे खते मुळांच्या कक्षातच राहतात. या लेखात आपण विद्राव्य खतांचा फवारणीद्वारे होणारा वापर आणि फायदे यांची माहिती घेणार आहोत.

Updated on 16 December, 2021 2:10 PM IST

 मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार पुरवणे आवश्यक असते. विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यातून जास्त खते परिणामकारकरित्या देणे शक्य होते. त्यामुळे खते मुळांच्या कक्षातच राहतात. या लेखात आपण विद्राव्य खतांचा फवारणीद्वारे होणारा वापर आणि फायदे यांची माहिती घेणार आहोत.

 फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर

  • पिकांना जमिनीतून पोषकद्रव्यांचा पुरवठा करण्यासोबतच पर्णरंध्रे मधून पिकांचे पोषणही एक पूरक प्रभावी पद्धत आहे.
  • जवा ठराविक परिस्थितीमुळे पिकांना अन्नद्रव्य देणे मर्यादीत असते, तेव्हा पर्णरंध्रे च्यामाध्यमातून पिकांना अन्नद्रव्य देणे फायदेशीर ठरते.
  • वातावरणीय बदल अशा परिस्थितीमध्ये जमिनीचा उच्च सामू, तापमानामुळे तणाव, खूप कमी किंवा खूप जास्त मातीचा ओलावा, बंधारे पसरणारे बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि मातीमध्ये पोषक द्रव्यांचे असंतुलन अशा गोष्टी जाणवतात, तेव्हा पिकांना जमिनीतून आवश्यक तेवढी अन्नद्रव्य देणे शक्य होत नाही. अशावेळी पानांद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा उपयुक्त ठरतो.

फवारणीद्वारे विद्राव्य खते देण्याचे फायदे..

  • जमिनीतून आणि पर्णरंध्रे द्वारे पिकांना केला जाणारा अन्नपुरवठा या दोन्ही पद्धतीचे तुलना केली असता पर्णरंध्रे द्वारे दिल्या जाणाऱ्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता आठ ते दहा पट जास्त असते.
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागताच त्वरित ती कमतरता पानांद्वारे पोषक देऊन भरून काढता येते.
  • वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत पिकांना वेगवेगळ्या प्रमाणात पोषकद्रव्ये आवश्यक असतात. ज्यावेळी पोषण संतुलित ठेवणे कठीण असते तेव्हा पीक वाढीच्या मुख्य टप्प्यात फवारणीद्वारे पिकांना अन्नद्रव्ये देऊन पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. फवारणीद्वारे दिल्या जाणाऱ्या खतांचे गुणधर्म..
  • फवारणीद्वारे देण्यात येणारे खतांचे गुणधर्म हे जमिनीतून देण्यात येणाऱ्या खतांच्या गुणधर्म अपेक्षा बऱ्याच अंशी वेगळी असतात. मुळे आणि पाणी या दोन घटकांचे संरचना आणि कार्य प्रणाली मुळे हे गुणधर्म वेगळे असतात.
  • पिकांना फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांचा सामू पाचपेक्षा कमी नसावा. काहीवेळा अशी खते पिकांच्या पानांना इजा पोहोचवू शकतात. पानांच्या वरिल पृष्ठभाग आमला ने भाजला जाऊन पाणी कोमेजतात.
  • फवारणीद्वारे देण्यात येणारी खते अशा पद्धतीचे असावीत किती पाण्यात विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या फवार यातील पाण्याच्या बिंदूचा आकार धुक्यासारखा असावा. एखादे पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळून संतृप्त द्रावण बनवणारी असावेत.
  • विशिष्ट घटकांमुळे फवारणीत खतांच्या द्रावणाचे सूक्ष्म थेंबा मध्ये पृथकरण मोठ्या प्रमाणावर होऊन ते द्रव्य पानाच्या पृष्ठभागावर उत्तम पद्धतीने पसरून पर्णरंध्रे द्वारेजास्तीत जास्त प्रमाणात शोषले जाते.ते त्वरितप्रकाशसंश्लेषण यासाठी वापरात येऊन त्याची कार्यक्षमता वाढलेली असते.
  • विद्राव्य खतांचे परिणामकताअधिक असते. त्यांची शिफारशीत मात्रेमध्ये फवारणी केल्यास चांगले उत्पादन मिळते.
English Summary: use of water soluble fertilizer by sprey many advantage and use
Published on: 16 December 2021, 02:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)