रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा पिकावर जमिनीद्वारे व बियामार्फत पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मर रोग, खोडकुज, मुळकुज इत्यादी रोगांचा समावेश होतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो.
परंतु रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो.रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा सारख्या जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या उपयुक्त बुरशीचा वापर करणे गरजेचे झाले आहे. या लेखात आपण हरभरा पिकावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर कसा करतात याबद्दल माहिती घे
ट्रायकोडर्मा बुरशी ची कार्यपद्धती
ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून अलीकडे रासायनिक बुरशीनाशके ला पर्याय म्हणून तिचा उपयोग हरभरा पिकावरील रोग नियंत्रणाकरिता होत आहे.
या बुरशीच्या 89 च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी ट्रायकोडर्मा अस्पिरिलम,ट्रायकोडर्मा हरजियानमया प्रजाती मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरला जातात.ही बुरशी जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या आरोग्यकारक बुरशी फ्युसाऱीयम, रायझोकटोनिया, पिथीयम,फायटोप्थोरा इत्यादी बुरशीचा नायनाट मोठ्या प्रमाणात करते. सर्वप्रथम ट्रायकोडर्मा बुरशी हानीकारक बुरशीच्या तंतू मध्येविळखा घालून त्याभोवती आपल्या तंतुमय वाढीचे आवरण तयार करते तसेच ही बुरशीग्लायोटोक्सिनसारखे प्रतिजैविके निर्माण करून हानीकारक बुरशींची वाढ थांबवते. तसेच ट्रायकोडर्मा ने पिकांच्या मुळांवर तयार केलेल्या वेस्ट ना मुळे पिकांमध्ये सिस्टिमिकएक्वायार्ड रेझिस्टन्स निर्माण होते व जमिनीतील हानीकारक मळ व इतर रोगांपासून पिकांचे संरक्षण होतं.
ट्रायकोडर्मा ने जमिनीचे संस्कारणव बीजप्रक्रिया चे फायदे
- हरभरा पिकावरील जमिनीतून अथवा बियाणे द्वारे पसरणाऱ्या मर रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो.
- हरभरा बियाण्याची उगवणक्षमता वाढते.
- प्रतिहेक्टरी पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
- ट्रायकोडर्मा वापरणे कमी खर्चिक व सोपे आहे, त्यामुळे मररोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.
ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत
- जमिनीच्या संस्करण ( मातीचे संस्करण )- ट्रायकोडर्मा आणि मातीचे संस्करण पीक लागवडीचे आठवडाभर आधी करावे. जमिनीत थोडासा ओलावा असल्यास अधिक फायदेशीर ठरते. एक हेक्टर क्षेत्र पाण्यासाठी दोन ते तीन किलो ट्रायकोडर्मा भुकटी 40 ते 50 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रित करून घ्यावी.
- हे मिश्रण थोडे ओलसर करून काही वेळ सावलीत ठेवावे. नंतर हे मिश्रण संध्याकाळच्या वेळेत एक हेक्टर क्षेत्रात पसरून मातीत मिसळावे.
- बीजप्रक्रिया- ट्रायकोडर्मा ही कृषी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पद्धत म्हणजे बीजप्रक्रिया होय. पेरणीच्या वेळी पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडर ची बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
- द्रावणात रोपे बुडवणे-(इतर पिकांसाठी)
गादीवाफ्यावर रोपे तयार झाल्यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा या बुरशीचे 500ग्राम द्रावण पाच लिटर पाण्यात मिसळून एकजीव द्रावण तयार करावे व त्यात रोपांची मुळे पाच मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
Published on: 04 November 2021, 11:27 IST