Agripedia

आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, पिकांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन हातात घ्यावे यासाठी खतांच्या बाबतीत कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले जाते.या संशोधनाचे स्वरूप म्हणजे शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नॅनो युरिया हे होय.

Updated on 18 August, 2022 1:09 PM IST

आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, पिकांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन हातात घ्यावे यासाठी खतांच्या बाबतीत कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले जाते.या संशोधनाचे स्वरूप म्हणजे शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नॅनो युरिया हे होय.

यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून त्या माध्यमातून या युरियाची  निर्मिती करण्यात आली आहे. शेतकरी बंधूनी या युरियाचा वापर करण्यामागील काय फायदे आहेत? याबद्दल या लेखात आपण माहिती घेऊ.

नक्की वाचा:कमी वेळात लाखोंची कमाई! तीळ लागवडीसोबत करा हे काम; शेतकरी होतील मालामाल, जाणून घ्या...

 नॅनो युरिया वापरण्याचे फायदे

1- या युरियाचा होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचा वापर तुम्ही सगळ्या प्रकारच्या पिकांसाठी करू शकतात.

2- या युरियाच्या वापराने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ तर होणारच परंतु पर्यावरणाची जी हानी होते तीदेखील थांबण्यास मदत होणार आहे.

3-हवा,पाणी आणि माती ची गुणवत्ता सुधारण्यास यामुळे मदत होते व या घटकांचे कार्यक्षमता देखील सुधारते.

4- या युरियाच्या वापराने उत्पादनात तर वाढ होतेच परंतु त्यांची गुणवत्तादेखील सुधारते.

नॅनो युरियाची वापर करण्याची पद्धत

 जर आपण नॅनो युरियाच्या वापराचा विचार केला तर एक लिटर पाण्यासाठी दोन ते चार मिली वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु काही पिकांना नत्राची आवश्यकता कमी प्रमाणात असते अशा पिकांसाठी 2 मिली आणि ज्या पिकांना नत्राची मात्रा अधिक लागते त्या पिकांसाठी चार मिली प्रति लिटर हे प्रमाण घेउन फवारणी करणे अधिक परिणामकारक ठरते.

भाजीपाला, भुईमूग सारखे तेलबिया वर्गीय पिके, कापूस इत्यादी पिकांवर दोनदा या युरियाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली असून कडधान्ये वर्गीय पिकांचीसाठी फक्त एकदा फवारणी करण्याची शिफारस आहे.

दोनदा फवारणी करायची असेल तर पहिली फवारणी लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरी ही पीक फुलोरा अवस्थेत येण्याचा एक आठवडा आधी करावी. एक एकर क्षेत्रासाठी दीडशे लिटर पाणी करून फवारणी करणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..

अधिक परिणामकारक रिझल्ट येण्यासाठी ही काळजी घ्या

1- वापर करण्या अगोदर नॅनो युरियाची बाटली चांगली हलवून घ्यावी.

2- स्प्रे पंपाचा प्लेट फॅन नोजल वापरावा.

3- सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. जर प्रखर सूर्यप्रकाश किंवा जोरदार वारे असतील, तेव्हा फवारणी करणे टाळणे उत्तम ठरते.

4- जर तुम्ही पावसाळ्यात फवारणी करत असाल व फवारणी केल्यानंतर दहा ते बारा तासांच्या आत पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी नाहीतर त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.

5- हा युरिया विषमुक्त आहे परंतु तरी सुद्धा स्वतःची सुरक्षितता जपण्यासाठी फवारणी करताना फेस मास्क आणि हात मोजे वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्याची साठवणूक करताना थंड आणि कोरड्या जागी करावी.

नक्की वाचा:पुणे लोकसभा मतदार संघात फडणवीसांसाठी चाचपनी, केंद्रात दिली मोठी जबाबदारी

English Summary: use of nano urea do help in healthy crop growth and more production
Published on: 18 August 2022, 01:09 IST