Agripedia

कांदा हे एक नगदी प्रकारचे पीक आहे. नगदी पीक असल्यामुळे शेतकरी कांद्याची लागण ही मोठ्या प्रमाणात करत असतात. तसेच कांद्याला भाव सुद्धा बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात मिळत असतो.कांदा लागवड ही 2 प्रकारे केली जाते ती म्हणजे रोप लावून आणि दुसरी म्हणजे बी पेरून. कांद्याचे बीज सुद्धा मोठ्या प्रमाणात महागडे असते त्याचा भाव 5 हजार रुपये किलो पर्यँत होत असतो.

Updated on 13 October, 2021 2:00 PM IST

कांदा हे एक नगदी प्रकारचे पीक आहे. नगदी पीक असल्यामुळे शेतकरी कांद्याची लागण ही मोठ्या प्रमाणात करत असतात. तसेच कांद्याला भाव सुद्धा बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात मिळत असतो.कांदा लागवड ही 2 प्रकारे केली जाते ती म्हणजे रोप लावून आणि दुसरी म्हणजे बी पेरून. कांद्याचे बीज सुद्धा मोठ्या प्रमाणात महागडे असते त्याचा भाव 5 हजार रुपये किलो पर्यँत होत असतो.

 कांद्याचा आकार हा एकसारखा होत नाही:

जर का घरच्या घरी कांद्याचे बियाणे निर्माण करून सुद्धा आपण बक्कळ नफा मिळवू शकतो. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे. मागील  साली  भारतात  सरासरी  प्रमाणे १२.७ लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा या पिकाची लागवड झाली होती. म्हणजेच जवळपास ९ ते १० हजार टन बियाणाची पेरणी झाली भारतात झालेली होती.बरेच शेतकरी बियाणे ही  बाजारातून विकत घेतात ते त्याचा दर्जा वगैरे बघत नाहीत तसेच बाकीचे शेतकरी बी हे स्वतःच्या रानात तयार करत असतात. परंतु शेतकरी उत्पादन करताना बियानाच्या जातीची किंवा शुद्धता, मानक प्रमाण आणि तंत्र यावर फारसे ध्यान देत नाही. याचा परिणाम आपल्याला पिकावर दिसून येतो तसेच कांदा काढणीच्या वेळेस कांद्याचा आकार हा एकसारखा होत नाही.

कांद्याच्या बीजउत्पादन पद्धती:-

1)कांदे न काढता त्याच रानात वरंब्या वर रोपांची लागण करणे. आणि जोपर्यंत कांदे निघत नाहीत तोपर्यंत ते तसेच ठेवावे. परंतु या पद्धतीत उत्पन्न हे कमी प्रमाणात मिळत असते. या लागवड पद्धतीमध्ये फक्त खरीप जातीचे बियाणे तयार करता येऊ शकते.

2)या दुसऱ्या पद्धती मध्ये कांदा काढून झाल्यावर त्याची साठवनुक करून काही कालांतराने त्याच कांद्याची लागण करून रोपनिर्मिती केली जाते. तसेच यातून मिळणारे उपन्न हे मोठ्या प्रमाणात असते.

हवामान आणि लागवड हंगाम:

कांदा पीक बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अधिक तोट्याचे असते. कांदा लावल्यापासून ते त्याच्या फुलांचे दांडे निघेपर्यंत थंड हवामान असणे खूप गरजेचं आहे. म्हणजेच रब्बी हंगाम म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांदे कापून लावले तर त्यामधून आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकतो.

जमीन:-

कांदा रोप बीज उत्पादनासाठी माध्यम ते भारी चोपण, क्षारयुक्त, मुरमाड व हलकी जमिनी खूप आवश्यक असते.सर्वसाधारण पणे मध्यम आकाराचे जर कांदे वापरले तर दर हेक्टरी २५ ते ४० क्विंटल कांदे बियाणे म्हणून लागतात. म्हणजे ५० क्विंटल कांदा हेक्टरी बाजूला ठेवला पाहिजे. तसेच लागवडीची पद्धत म्हणजे सरी वरंबा व सिंचन या नुसार ही मात्रा बदलते. तसेच ताणाचे योग्य नियोजन करावे आणि जास्त ताण पिकांवर दसू नये.

English Summary: Use modern technology to double onion seed production and get a good yield
Published on: 13 October 2021, 02:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)