रोजच्या आहारातील लोकप्रिय फळभाजी आहे. या फळभाजीची बारमाही लागवड केली जाते. बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने भेंडीची लागवड केल्यास सरासरी उत्पादनात वाढ होते. भेंडी लागवडीचे बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान खालील प्रमाणे,भेंडी पिकाच्या संकरित जाती- भेंडी पिकाच्या लागवडीसाठी खालील पैकी एका जातीची निवड करावी. एकूण १ क्षेत्रासाठी २ ते २.५ कि. ग्रॅम या प्रमाणात बियाणांचा वापर करावा.
१) राधिका २) सलोनी ३) एस डब्ल्यू ००१ ४) सिंघम ५) चिरंजीवी ६) सुकन्या ७) हरित ८) जान्हवी ९) बिंदू २१६ १०) झील्मील ११) शिवांश १२) अंकिता १३) एस डब्ल्यू ००३ १४) मायना २४, १५) रोहिणी १६) करिष्मा,
जाणून घ्या सविस्तर शेतीसाठी फायदेशीर असलेला ट्रायकोडर्मा व्हीरीडी
१७) महिको २८, १८) जे के ७३०५ १९) सिजेंटा ओएच १०२ लागवडपूर्व तयारी - भेंडी पिकाची लागवड करण्यापूर्वी ६ मेट्रीक टन वाळलेल्या व कुजलेलया शेणखताचा वापर करावा. Before planting the okra crop, 6 metric tons of dried and decomposed cow dung should be applied.
नांगरटीपूर्वी ३ वर्षातून एकदा सबसॉयलरचा वापर करावा. सबसॉयलर उभे व आडवे ५ फुट या प्रमाणात असावे प्रत्येक ३ वर्षांनंतर माती व पाणी परीक्षण करून घ्यावे.सरीची दिशा शक्यतो उत्तर दक्षिण ठेवावी लागवड करण्यापूर्वी बीव्हीजी कार्बन प्लस २ लिटर प्रती २५० लिटर पाणी या प्रमाणात जमिनीवर फवारून घ्यावे बेसलडोस - बीव्हीजी जैविका प्रोमखत २५० ते ३०० कि. ग्रॅ., पोटॅश ७५ कि. ग्रॅ, सिलिका ५० कि. ग्रॅ,
निंबोळी पावडर १५० कि. ग्रॅ, आयसीएल पॉलिसल्फेट ५० कि. ग्रॅ. सूक्ष्म अन्नद्रव्ये १५ कि. ग्रॅ., मायकोरायझा (बेनटोनेटे कोटेड) ४ कि. ग्रॅ. व रिजेंट किंवा फ़र्टेरा ५ कि. ग्रॅ या प्रमाणात बेसल डोस द्यावा.लागवडीनंतर - भेंडी लागवड केलेल्या क्षेत्राच्या चारही बाजूने मका पिकाच्या ४ ओळीची लागवड करावी. त्यामुळे पिकाचे उष्णवाऱ्यापासून संरक्षण होते.भेंडी पिकात ज्वारी, मका, चवळी व झेंडू या
सापळा (Trap crop) पिकाची लागवड करावी. लागवड झाल्यांनतर ३० ते ३५ पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. सदर सापळे २५ ते ३० दिवसांनी बदलावेतटीप - भेंडी पिकाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधे व खतांच्या प्रभावी परिणामांसाठी फवारणी करण्यापुर्वी पाण्याचा सामू (पी.एच) ५.५ पर्यंत नियंत्रित करुन घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
जयवंत भोसले
सल्लागार बीव्हीजी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड
7774081438
कॉल सेंटर 02067322700
व्हाटस ॲप 7720937720
Published on: 20 October 2022, 05:04 IST