Agripedia

अर्थातच शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे हाच त्याचा मोठा उद्देश व जमीन टिकवणे हाही एक उद्देश असावा

Updated on 15 February, 2022 4:55 PM IST

अर्थातच शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे हाच त्याचा मोठा उद्देश व जमीन टिकवणे हाही एक उद्देश असावा त्या अनुषंगाने शेतात अंडा संजीवक वापरल्याने अप्रतिम बदल दिसून येतात व पिकांना आणि मातीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

दूध हे पूर्ण अन्न आहे , अंड्यात लागणारे व्हिटॅमिन व प्रोटीन असतात तर गुळामध्ये पिकास आवश्यक असणारे मिनरल्स असतात . मी गेल्या 1 वर्षांपासून तसेच मित्रांच्या देखील डाळीम्ब , हळद , द्राक्ष , आंबा या बागावर यांचे प्रयोग केले. याचे उत्तम परिणाम पहायला मिळतात. 

याला दोन प्रकारे वापरता येते 

फवारणी

1 ली गायीचे किंवा म्हशीचे न तापवलेले दूध , 4 अंडी गावरान किंवा बॉयलर , 400 ग्राम गुळ हे सर्व एकत्र तयार करून फवारणीच्या 1 ली पाण्यात 5 मिली द्रावण टाकणे , म्हणजेच 15 ली चा पम्प असेल तर 75 मिली आणि तापमान कमी असताना फवारणी करणे. 

मला आढळून आलेला फरक 

झाडांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते ,निर्देशांक पान वाढतो , सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळून पीक अतिशय निरोगी राहते .

जमिनीतून पाण्यावाटे

5 ली दूध , 12 अंडी , 2 ते 4 किलो गुळ एकत्र करून 200 ली पाण्यात मिसळून एका एकरला महिन्यातून 1 डा देणे 

हे सर्व घटक नैसर्गिक असल्याने याचा उचल चांगली होतो. 

पिकावर , फळावर , धान्यावर चकाकी येते व वजन देखील वाढते 

आपण रासायनिक शेती जरी करीत असाल तरी महिन्याला 1 दा ही फवारणी निश्चित करा , खूप फरक जाणवेल.शेतकरी बंधुनो, 

सध्या पाऊस जास्त झाल्याने 

कपाशी, फळ पिके, फारच खराब झाली आहे माणुस आजारी असला की टाॅनिक ची आवश्यकता असते

तसेच पिकांना वर सांगितलेल्या प्रमाणे गायीचे दुध, अंडी, गुळ, गायीचे गोमुत्र, टाकुन दोन दिवस मुरवावे व कपाशी वर फवारणी करावी, तसेच ठिबक मधुन सोडावे 

   महागडी औषधी घेण्या पेक्षा कमी खर्चात वरील प्रमाणे वापर केल्यास फायदाच होईल. 

 

 शरद केशवराव बोंडे.

प्रग्तशील शेतकरी

  9404075628

English Summary: Use anda sanjivak in farming and see result
Published on: 15 February 2022, 04:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)