यामुळे दिलेले खते पिकांना लागू होत नाहीये,जवळपास सर्वसाधारण 50% खते आणि त्यावरील खर्च वाया जात आहे.
जमिनीची क्षारता वाढत आहे,कडक जमिनी तयार होत आहे,पीक आणि उत्पादन खर्चाच्या माँनाने येत नाहीये.
मग यावर उपाय म्हणजे जमीनचा ph कमी करणे,क्षारता कमी करणे,जमीन भुसभुशीत ठेवणे ,यासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने उपाय करताना कोणी सलफुरीक,फॉस्फोरीक चा वापर करत आहे,कोणी विविध प्रकारच्या सोईल कंडिशनरचा वापर करत आहे,कोणी सेंद्रिय उत्पादने आणून टाकत आहे,कोणी बॅक्टरीया वाढवत आहे,पाण्याचं नियोजन करून वाफसा आणत आहे.
असे एक ना अनेक प्रकारचे उपाय करत असताना एक अतिशय सहज सोपा आणि गुणकारी हितकारी उपाय म्हणजे युरिया आणि सल्फर एकत्र वापर करणे होय.
काय होते यामुळें?
युरिया एकरी 3 किलो आणि सल्फर 3 किलो एकत्र केल्याने त्याचे रूपांतर युरेट ऑफ सल्फर ह्या मध्ये होते आणि हा द्रव्य जमिनीत अनेक प्रकारचे काम करायला लागतो .
1) जमीन साफ करणे-जमिनीतील अतिरिक्त क्षार,नको असलेले घटक यांना साफ करण्याचे काम होतें
2)मुळीला नवीन चाल किंवा गती मिळते,मुळी अक्टिव्ह होतें
3) अन्नद्रव्य उचलायला मदत मिळते
4)बॅक्टरीया किवा सेंद्रिय वस्तुंना अडथळा होत नाही
5)युरिया मध्ये नत्र असले तरी सल्फर सोबत एकत्रित आल्याने अतिरिक्त नत्र वाढत नाही
6)नत्राचा वापर किंवा गरज ही पाहिल्यापासून तर शेवटपर्यंत लागते पिकाला ती गरजही थोडयाफार प्रमाणात भागत
7)जमिनीचा ph कॉन्ट्रोल राहतो,तापमान व्यवस्थित राहते
8) मुळी कायम सशक्त ,जोमदार राहुन वनस्पती शेवटपर्यंत ताण विरहित राहते
9)उत्पनात वाढ
होते,उत्पादनाची गुणवत्ता सुधारते
10)सलफुरीक ऍसिड ला उत्तम पर्याय.
11) द्राक्षबागेसाठी दर पंधरा दिवसाला युरेट ऑफ सल्फर चा वापर करावा.
Published on: 20 December 2021, 01:14 IST