खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद हे महत्त्वाची पिके गणली जातात.उडीदाचे लागवड रब्बी हंगामात देखील केली जाऊ शकते. हे पीक 70 ते 75 दिवसात काढायला येते. त्यामुळेच कमी पाऊस जरी असला तरी खरीप हंगामामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते.
मिश्र पीक पद्धती साठी तसेच दुबार पीक पद्धती साठी उडदाचे लागवडही महत्त्वाचे ठरू शकते. या लेखामध्ये आपण उडीद लागवड विषयी माहिती घेऊ.
- आर्थिक महत्त्व :-
उडदा मध्ये 24 टक्के प्रथिने व 60 टक्के कर्बोदके असतात. उडदाचा उपयोग पापड बनवण्यासाठी देखील होतो. सर्व डाळिंपेक्षाउडदा मध्ये फॉस्परिकआम्लाचे प्रमाण अधिक असते.
- जमीन व हवामान:-
उडीद हे पीक मध्यम ते भारी निचऱ्याच्या जमिनीत उत्तम प्रकारे येते जास्त तापमान या पिकासाठीउत्तम आहे. तसेच जास्त पाऊस या पिकाला हानिकारक आहे.
- पूर्वमशागत:-
जमिनीत एक हलकी नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
- पेरणीचा हंगाम व वेळ:-
हे पीक खरीप हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरतात.
- बीज प्रक्रिया:-
हवेतील नायट्रोजनच्या स्थिरीकरण्यासाठी रायझोबियम जिवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे तसेच बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम 1किलो बियाण्यास लावावे.
- पेरणीचे अंतर व खोली:-
दोन ओळीतील 30 सें.मी. व दोन रोपातील अंतर 10 सें.मी. ठेवून बियाणे 5 सें.मी. पर्यंत खोल पेरावे.
- हेक्टरी बियाणे:-
प्रति हेक्टरी 15 ते 20 कि. ग्रॅ. बियाणे वापरावे.
- सुधारित वाण:-
- टी -9 :- कालावधी - 60 ते 65 दिवस उत्पादन - हेक्टरी 10-12 क्विंटल वैशिष्ट्ये – बुटका लवकर तयार होणारा खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य.
- टी.पी.यु. - 4 :- कालावधी – 70 75 दिवस
उत्पादन हेक्टरी -10 ते 12 क्विंटल. वैशिष्ट्ये - मध्यम टपोरे दाणे, गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशासाठी प्रसारित.
3)टी. ए. य. -1 :-कालावधी 70ते75 दिवस
उत्पादन– हेक्टरी 10 ते 11 क्विंटल वैशिष्ट्ये – टपोरे काळे दाने, अधिक उत्पन्न.
4)बी.डी.यू. -1 कालावधी – 70ते75 दिवस
उत्पादन-हेक्टरी 10 ते 12 क्विंटल.
वैशिष्ट्ये– टपोरे दाणे महाराष्ट्र प्रसारित
5)सिंधखेडा -1 :- कालावधी - 85 ते 90 दिवस
उत्पादन – हेक्टरी 6 ते 8 क्विंटल
वैशिष्ट्ये– विदर्भासाठी प्रसारित
6) पीकेव्ही उडीद -15 :- कालावधी - 65 ते 72 दिवस
उत्पादन – हेक्टरी 10 ते 12 क्विंटल वैशिष्ट्ये – अधिक उत्पन्न एकाच वेळी काढणीस येणारा.
- खत व्यवस्थापन:-
पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी दिल्यास उत्पन्न चांगले येते.
- पाणी व्यवस्थापन :-
पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी एक पाणी द्यावे. एकूण 2 ते 3 पाणी देणे आवश्यक असते. पीक फुलावर येण्याच्या वेळीतसेच दाणे भरण्याच्या वेळी पाणी देणे आवश्यक असते.
- आंतर मशागत :-
या पिकासाठी एका महिन्या पर्यंततणाचे नियंत्रण करणे आवश्यक असते. याकरिता दोन खुरपण्या पेरणीनंतर कराव्यात.
- परिपक्वता व काढणी :-
वाळलेल्या शेंगा तडकण्याचीप्रवृत्ती असल्यामुळे फार वाळेपर्यंत पिक शेतातच राहिल्यास शेंगा तडकून पिकाचे नुकसान होते. यासाठी वाळत आलेली झाडे काढून खळ्यावर शेंगा वाळवाव्यात.
- सरासरी उत्पादन :-
या पिकापासून सरासरी10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
Published on: 05 March 2022, 07:47 IST