पिकांची योग्य प्रकारे वाढ होवून त्याला फळे फुले व्यवस्थित येतात अशा पिकास सर्वसाधरण पणे निरोगी पिके म्हणतात..अशा पिकातील वनस्पतीच्या शरीरातील क्रिया उदा नियमित पेशी विभाजन आणि वाढ, जमिनीतून पाणि तसेच अन्नद्रव्य याचे योग्य प्रकारे शोषन प्रकाश संशेलषणामध्ये तयार झालेल्या अन्नाचे स्थलांतर आणि साठवण पुनरूत्पादन अतिशय नियमितपणे होत असते...ब-याच वेळा पिके रोगग्रस्त अथवा अशक्त राहिल्यामुळे कमकुवत दिसतात अशा पिकापासून योग्य उत्पादन मिळते असे नाही असा पिकास रोग आला असे म्हणतात.
पिकावर काही जिवाणूमुळे अथवा पर्यावरणातील बदलामुळे परिणाम होवून चयापचय क्रियांमध्ये बदल होतो.आणि पिक रोगग्रस्त होतो रोग हि पोषक हवामानात पिक आणि अतिसु जीव यांच्या परस्परक्रियेतून होणारी जैविक घटना असून तिचा झाडावर किंवा त्याच्या काही भागावर विकृती दिसतात त्यामुळे उत्पन्नात घट येते. झाडावर बुरशी ,जिवाणू, विषाणू , मायक्रोप्लाझमा इ अतिसू. जिवाण पासून पिकावर रोग पडतात. वेळीस आपणास ओळखता आला नाही तर पिक हातचे जाते त्यासाठी रोगाचे पिकावर काय परिणाम होते दिसतात.
वेळीस आपणास ओळखता आला नाही तर पिक हातचे जाते त्यासाठी रोगाचे पिकावर काय परिणाम होते दिसतात.1) बुरशी :- हे युकॅरियाॅटीक ,हरितद्रव्यविरहित मूलबिंदू (न्युक्विलयस) असलेले एकपेशीय अथवा बहूपेशीय धाग्यापासून शरीर बनलेले अति.सु. जीव असून त्याचे प्रजनन लैंगीक व अलैंगीक पध्दतीने होते पिकांवर आढळून येणारे 80% रोग बुरशीमुळे येतात.2) जिवाणू:- हा एकपेशीय विविध आकाराचे , छडीच्या आकाराची,
लंबवर्तळकार उभट आकाराचे गोलाकार मुलबिंदू असलेले हे अति.सु. जिव असून त्यांचे प्रजनन द्विभाजन पद्वतीने होते..यामुळे पिकावर अनेक प्रकारचे रोग पडतात.3) विषाणू:- हा संसर्गजन्य ठराविक पिकांवर जगणारे डीएनए , अथवा आरएनए ,न्यूक्लिक आम्ल व प्रथिने असलेले परोपजीवी सु.जीव असून त्यापासून विविध रोग होत असतात...आता तर नवनविन रोग या विषाणूमुळे होत आहेत.आपल्या पिकांवर हवामानाचे वातावरण बदलाचा प्रभाव मुळे रोग बुरशी किडी विषाणू जिवाणू दिसून ते खालील वातावरणात दिसून येते.
IPL Biologicals LTD
Prabhakar swami Sangli Kolhapur mo9730766055
Published on: 26 June 2022, 09:19 IST