तासगाव आणि नागेवाडी हे दोन्ही कारखाने खा संजयकाका पाटील यांच्या मालकीचे आहेत या दोन्ही कारखान्याची बिले थकीत होती प्रथम आम्ही 16 एप्रिल 2021 रोजी पहिले आंदोलन केले यावेळी काका स्वत्ता उपस्थित होते त्यांनी 30 एप्रिल पर्यंत बिले देतो असे सांगितले आम्हीही ते मान्य केले 30 एप्रिल तारीख उलटली पण त्यानंतर लॉक डाऊन लागला त्यामुळे जून महिन्यात आंदोलन केले त्यानंतर जुलै महिन्यात तीन दिवस काकाच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बसलो त्यांच्या नावाने भिक मागितली बोंब ठोकली, मुंडण केले महिलांनीही मुंडण केले महिलांनी मुंडण करणे ही राज्यातील पहिली घटना आहे भर पावसात ठिय्या मारून बसलो कार्यालयाबाहेरिल डांबरी रस्त्यावर झोपलो त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचे चेक देतो म्हणून सांगितले प्रतीकात्मक दहा चेक दिले पण नंतर टोलवा टोलवी सुरू झाली त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी मोर्चा काढला त्यावेळी सात कोटींचे धनादेश दिले ते वटले आम्ही जो लढायला तयार आहे जो जाब विचारायला रस्त्यावर येईल
त्याच्यासाठीच संघर्ष करणार ही सुरुवाती पासून भूमिका घेतली होती आंदोलनात आले त्याची बिले मिळाली जे राहिले होते ते आमच्याकडे यायला लागले मग त्याच्यासाठी 23 डिसेंबर रोजी शेवटचा मोर्चा काढायचा निर्णय घेतला म्हणून गुरुवारी मोर्चा काढला यावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे व पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सकारात्मक भूमिका घेत परिस्थिती हाताळली शेतकऱ्याच्या वतीने त्यांनीच खा संजयकाका पाटील यांच्याशी चर्चा केली 10 जानेवारी रोजी चे चेक देण्याची तयारी त्यांनी दर्षिविली तो निर्णय शेतकऱ्यांना सांगितला शेतकऱ्यांना विचारणा केली चेक घ्यायचे की आंदोलन सुरू ठेवायचे शेतकऱ्यांनी एक मुखाने चेक घ्ययची तयारी दर्शविली त्यामुळे चेक आम्ही घेवू असा निर्णय दिला त्यात तहसीलदार रांजणे सरांनी पाच दिवस उशिरा चेक घेवू पण वटणारे घेवू अशी भूमिका मांडली त्यामुळे 15 जानेवारी चे 17 कोटींचे धनादेश सर्व शेतकऱ्यांना देण्यात आले मात्र ही प्रक्रिया शुक्रवारी पहाटे पाच पर्यंत सुरू होती शेवटचा चेक पहाटे पाच वाजता तुषार जाधव वाजर याला दिला आणि आंदोलनाचा शेवट झाला यावेळी संदीप शिरोटे महेश जगताप दामाजी डूबल सरदार सावंत रवी पाटील निखिल कारंडे सुरेश पचीब्रे कारखान्याचे व्यवस्थापक आर डी पाटील सुरेश माने संजय मोहिते संजय पवार नंदू पवार आदी उपस्थित होते आम्ही बाहेर पडलो त्यावेळी लोक मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते विशेष म्हणजे रात्री एक वाजेपर्यंत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक दोघेही उपस्थित होते.
आंदोलनाचा शेवट झाला मात्र या वर्षभरात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले अनेक शेतकऱ्यांना उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत म्हणून टाचा घासून मरावे लागले , अशी घटना शिरगाव येथे घडली वडिलांचे तेरावे घालून त्यांचा मुलगा मोर्चाला आला होता,ज्योती दाभाडे ही भिलवडीची महिला पती ला परलीलीस झाला घर चालविणे मुश्किल झाले मुले लहान उपचारासाठी पैसे नाहीत ही महिला दिवसभर रडत होती तिला मात्र सोमवारचा धनादेश द्यायला भाग पाडले बोरगाव चा लहान मुलगा मोर्चात सहभागी झाला होता वडील आजारी आई कॉरोणा मुळे निधन पावली त्यालाही त्याच दिवशी चा धनादेश द्यायला भाग पाडले उषाताई जगताप या महिलेने मुंडण केले त्याच्याही धाडसाला सलाम या संपूर्ण आंदोलनाची सुरुवात पत्रकार जगदाळे सर यांच्या बातमीने झाली होती या संपूर्ण आंदोलनाला पुढारी सकाळ लोकमत तरुण भारत पुण्यनगरी जनप्रवास केसरी ललकार ,महानकार्य, जनतांडव,संकेत टाईम्स, वाळवा क्रांती, माणदेश एक्स्प्रेस,लोकमंथ न महासत्ता, लेखणी सम्राट बीबीसी मराठी,बंधुता, प्रती ध्वनी, आदीसह अन्य प्रिंट मीडियाच्या पत्रकारांनी प्रचंड सहकार्य केले तर abp माझा z24 तास, tv 9, ibn लोकमत, साम मराठी, लोकशाही, जय महाराष्ट्र, सी न्यूज, sbn मराठी, जनप्रवास live, मॅक्स महाराष्ट्र, वज्र धारी, सेव्ह न स्टार, सडेतोड मराठी न्यूज, रोखठोक,
Tv 1 मराठी, sk news, पब्लिक app, जनमत, स्वाभिमानी न्यूज , जागर, तिसरा डोळा , सिटी इंडिया न्यूज, आदीसह अन्य मीडियाच्या पत्रकार मंडलीचे सहकार्य लाभले काही जणांची नावे अनवधाना नद राहिली असण्याची शक्य ता आहे या सर्वाचा मी आभारी आहे तसेच कवठे एकंद ग्रामस्थांनी तासगाव येथील ठिय्या आंदोलना वेळी सर्व आंदोलकांना जेवण पूर विले त्यांचेही आभार तसेच तासगाव आंदोलनावेळी उद्योजक भालचंद्र पाटील संजय बेले यांनी मध्यस्थी केली त्यांचेही आभार या संपूर्ण आंदोलनात जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही योगदान दिले आहे याशिवाय संदीप शिरोटे, अशोक खाडे, महेश जगताप , दामाजी दूबल, गुलाब यादव, भुजंग पाटील , प्रकाश साळुंखे, संदेश पाटील, शशिकांत माने, बसवेश्वर पावटे, अनिल पाटील, सुरेश पाचीब्रे, राजेंद्र माने,भागवत जाधव,
तानाजी धनवडे, अख्तर संदे, सचिन महाडिक, विनायक पवार, सरदार सावंत, महादेव पवार,विशाल पाटील,आशिष पाटील, चंद्रकांत पाटील,शाम पवार, समीर तांबोळी,हणमंत पाटील, अनिल वाघ, प्रशांत शिंदे, विठ्ठल सावंत, अमित रावतले,सिकंदर शिकलगार, दीपक पाटील, प्रदीप लाड, भीमराव निकम, रवींद्र जगदाळे, बाबासाहेब शिंदे ,प्रशांत शिंदे, संपतराव पाटील, अभिजित शिंदे , सचिन वाघ, नागेश खामकर , निलेश पाटील, महेश चौगुले, विश्वजित गायकवाड, रोहित वारे, दत्ता जाधव, उमेश जाधव, सुशांत जाधव, विकास शिंदे, सुरज शिंदे पाटील, संतोष गुरव, बंडा उर्फ प्रवीण पाटील देशमुख,, जालिंदर जाधव सचिन चव्हाण,अशोक पवार, रोहित जंगम, गौरी कुलकर्णी, नितीन महाडिक आदींनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कस्ट घेतले मी आणि आमची टीम सर्वांचे आभारी आहे.
महेश खराडे
9850693701
8329121717
Published on: 27 December 2021, 02:37 IST