Agripedia

बदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही घटक पीक उत्पादनावर परिणाम करण्यासाठी कारणीभूत आहेत. संकरित जाती आणि पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामामध्ये सलग पिके घेत आहेत

Updated on 19 October, 2021 6:17 PM IST

बदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही घटक पीक उत्पादनावर परिणाम करण्यासाठी कारणीभूत आहेत. संकरित जाती आणि पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामामध्ये सलग पिके घेत आहेत

 खते आणि पाण्याच्या अतिवापराने हजारो एकर जमीन क्षारपड झाले आहेत. जमिनीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. या लेखात आपण कंपोस्ट खत बनवण्याच्या पद्धती जाणून घेणार आहोत.

 कंपोस्ट खत कसे बनवावे?

अ)चौदा दिवसात कंपोस्ट तयार करण्याची पद्धत-

1- वाळलेल्या किंवा हिरव्या वनस्पतींच्या फांद्या, काडीकचरा व पालापाचोळा इत्यादी बारीक करून घ्यावे.

2-ताज्याशेणासोबत सोबत वरील पदार्थ चांगले एकत्र करून घ्यावे.

3- एकत्रित केलेल्या पदार्थाचे ठीक एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर उंचीचे करावेत ढीगाची उंची एक मीटरपेक्षा जास्त करू नये.

 तयार केलेल्या ढीघाला केळीचे पान  फाटलेले पोते किंवा ताडपत्रीनेझाकावे.

5- चार दिवसानंतर ढिगाचा आतील भाग गरम होईल. जो भाग गरम झाला नसेल त्यामध्ये खत मिसळावे.

6-ढिग खालीवर करताना आतील भाग व बाहेरचा भाग आत जाईल याची काळजी घ्यावी.

7- त्यानंतर प्रत्येक दोन दिवसानंतर ढिग खालीवर करावा.

आ) तीन कप्प्यात कंपोस्ट तयार करण्याची पद्धत-

1- शेतावर बांबूच्या कामट्या किंवा इतर सहाय्याने तीन कपड्यांची आयताकृती तयार करा. आयताकृती चा आकार 5×1.5×1.5 मीटर असायला पाहिजे.

2- पहिल्या कप्प्यात पालापाचोळा, गवत, झाडांचे तुकडे भरावेत. थोडी माती किंवा प्राण्यांचे खत मिसळून  पहिला कप्पा पूर्ण भरावा.

3- एका महिन्यानंतर पहिल्या कप्प्यातील कंपोस्ट फावड्या च्या सहाय्याने दुसऱ्या कप्प्यात भरावे.थर खालीवर करून एकजीव करावेत.

4

- दुसऱ्या टप्प्यावर माती टाकून ते सतत ओलसर व मोकळी राहील याची काळजी घ्यावी.

5- रिकामा झालेला पहिला कप्पा लगेच पूर्वीप्रमाणे भरून घ्यावा. जेणेकरून कंपोस्ट तयार करण्याची क्रिया सतत चालू राहील.

6- परत एक महिन्यानंतर दुसऱ्या कप्प्यातील कंपोस्ट काढून तिसरा कप्प्यात भरा.त्याला पूर्णपणे हवा लागू दिल्यानंतर मातीने झाकून टाकावे.

7- एक महिन्याने त्यातील कंपोस्ट शेतीसाठी वापरता येते.

English Summary: two method of making compost fertilizer and benifit of compost
Published on: 19 October 2021, 06:16 IST