कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.या दोन्ही रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असते. या लेखात आपण कांदा पिकावरील मर आणि करपा रोगाविषयी माहिती घेऊ
कांदा पिकावरील मर आणि करपा रोग
रोपवाटिकेतील मररोग-
- कांदा पिकाच्या रोपवाटिकेमध्ये फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे मर रोग होतो.
- खरीप हंगामातील हवामान या रोगाच्या प्रादुर्भाव आणि या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते.
- रोपवाटिकेत जर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर रोपांची मानजमिनीलगत अचानक कुजून तीकोलमडलेली दिसते.
- जमिनीत जर बुरशी असेल तर लागवडीनंतर हि प्रादुर्भाव होतो
उपाययोजना
- कांदा पिकाचे रोपवाटिका टाकताना शेतात तिची जागा दरवर्षी बदलावी.
- ज्या ठिकाणी रोपवाटिका टाकायचे आहे त्या ठिकाणची जमीन उत्तम पाण्याचा निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची असावी.
- रोपे तयार करताना गादीवाफ्यावर करावी.
- कांदा रोपवाटिका टाकताना कांद्याचे बियाणेहे निरोगी, स्वच्छ व खात्रीलायक असावे.
- रोपवाटिकेत बी टाकण्यापूर्वी बियाण्यावर थायरम तीन ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- गादीवाफ्यावर बियाणे पेरण्यापूर्वी कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम प्रती वाफा या प्रमाणात मिसळावे. तसेच पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा 30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन्ही ओळीच्या मध्ये ड्रेचिंग करावे. त्यानंतर त्वरित पोहोच पाणी द्यावे.
करपा रोग
काळा करपा
- काळा करपा या रोगांचा प्रादुर्भाव खरीप हंगामात कोलेटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होतो.
- या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला पानांवर आणि मानेवर गोलाकार काळे डाग पडतात.
- योग्य पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रोगाचे प्रमाण वाढून पाने करपतात.
- पाण्याचा निचरा न झालेल्या ठिकाणी या रोगामुळे कांद्याच्या माना लांबलेल्या दिसतात.
काळा करपा रोगावरील उपाय योजना
1-उन्हाळ्यात नांगरटी करून जमीन चांगली तापू द्यावी आणि पिकांची फेरपालट करावी.
2- पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम अधिक कॅप्टन दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- रोपवाटिकेत रोपे उगवल्यानंतर पंधरा दिवसातून मॅन्कोझेब 25 ग्रॅम हार्दिक डायमेथोएट 15 मिली अधिक स्टीकर 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे दोन वेळा फवारणी करावी.
- कांद्याचे पुनर्लागवड करताना रोपे हे मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
- कांद्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी या रोगाची लक्षणे दिसताच 10 ते 15 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवाटॅब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकाची फवारणी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात मिसळून करावी.
टीप– पिकांवर कुठल्याही प्रकारची फवारणी करण्याअगोदर कृषी तज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Published on: 05 December 2021, 09:14 IST