भारतात अनेक मसाल्याच्या पदार्थांची लागवड केली जाते आणि शेतकरी बांधव मसाला लागवडीतून बक्कळ कमाई देखील करत आहेत, मसाला पिकांची लागवड शेतकरीच्या उत्पन्नात वाढ आणून देण्यास सक्षम आहे. असेच एक मसल्याचे पिक म्हणजे लसूण, लसूण लागवडीतून अनेक शेतकरी बांधव चांगली तगडी कमाई करत आहेत.
परंतु असे असले तरी प्रत्येक पिकातुन चांगले उत्पादन घेण्यासाठी नियोजन आणि रोगावर वेळीच रोकथाम करणे फार महत्वाचे असते. आज आपण लसूण पिकात लागणारे दोन किड व त्यावरील उपचार ह्याविषयीं महत्वपूर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. तसे बघायला गेलं तर लसूणची शेती एक फायद्याचा सौदाच आहे, पण कधीकधी त्यात किडिंनी हल्ला केला की मग लसूण लागवड घाट्याचा सौदा ठरतो.
जर शेतकऱ्यांनी वेळीच जातीने लक्ष दिले आणि काही खबरदारी घेतली तर लसनाचे पीक धोकादायक कीटकांपासून वाचू शकते. आणि उत्पादनात वाढ घडून येते. जर लक्षणे वेळेवर ओळखली गेली तर रोगावर देखील लवकर नियंत्रण करता येते, कसे ते जाणून घेऊया.
लसूण पिकावर आक्रमण करणारे प्रमुख किड
थ्रीप्स
थ्रीप्स हे लसून पिकाचे नुकसान करणारे सर्वात हानिकारक कीटक आहे. हा कीटक लहान पिवळ्या रंगाचा असतो, जो पानांचा रस चोखतो आणि त्यांच्यामध्ये लहान पांढरे डाग बनवतो. थ्रीपसमुळे पाने पिवळी पडतात आणि कोमेजतात आणि जास्त अटॅक झाला की झाड सुकते. परिणामी, पिकाची वाढ होत नाही पीक लहान राहते आणि ह्याचा परिणाम म्हणुन लसूण पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. या किडीमुळे लसूणच्या ऐन परागिभवणाच्या वेळी जास्त नुकसान करते.
जेव्हा थ्रिप्सची संख्या जास्त असतेम्हणजे साधारण प्रति रोपे 30 असते तेव्हाच कीटकनाशकाची फवारणी करावी. योग्य पीक रोटेशन करून आणि प्रगत तंत्रज्ञानाने शेती करा जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल.
नियंत्रण
इमिडाक्लोप्रिड @ 5 मिली/15 लीटर पाण्यात किंवा फिप्रोनिल 1 मिली/लीटर पाण्यात किंवा स्पिनोसॅड @ 100 मिली/हेक्टर घेऊन फवारणी करा. लसनुच्या पिकात पिवळ्या/निळ्या रंगाच्या चिकट पट्ट्यांचा वापर देखील थ्रिप्सच्या प्रतिबंधासाठी फायदेशीर आहे.
माइट्स
या किडीने संक्रमित रोपांची पाने पूर्णपणे उघडू शकत नाहीत आणि संपूर्ण वनस्पती जलेबीसारखी पिळली जाते. त्यामुळे लसुणच्या वाढीवर साहजिकच परिणाम होतो.
जे लसूण ह्या किडीमुळे प्रभावित असते त्या रोपांचे पानांच्या कडेचा भाग पिवळा होतो. लसूण पिकाच्या मूळ्या ह्या उथळ असतात आहे, म्हणून लसुणच्या मुळांमध्ये हवेच्या संचलनासाठी निंदनी अथवा खुरपणी करणे आवश्यक आहे. तण नियंत्रणासाठी हेक्टरी 3-4 लिटर पेंडामेथलिन 1000 लिटर पाण्यात मिसळून पाणी भरण्यापूर्वी आणि पेरणीनंतर लगेच फवारणी करावी. ह्यामुळे तन नियंत्रण होते आणि लसुणच्या पिकाची चांगली वाढ होते उत्पादन चांगले मिळते.
नियंत्रण
लक्षणे दिसताच, 1 किलो ओमाईट एक हेक्टरसाठी पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करावी, ह्यामुळे ह्या कीटकवर नियंत्रण राखता येते आणि उत्पादनात चांगली वाढ होते.
Published on: 05 October 2021, 11:18 IST