शेती आणि माति च्या संदर्भात लेख लिहत असतो. आपन भविष्यात शेती कशी करु यावर विश्लेषण केले आहे.आपन वाचाल मला आशा आहे.आपली शेती आजची नाही ही आपल्या पुर्वजांनी दिलेली भेट म्हणजे आजची शेती! सुपिक मातीची देणं आपल्या साठी सोन्याचा भरलेला घडा म्हणजे आपली शेती!मि हे पुन्हा पुन्हा शेती चे गुणगान का केले असल?
कारण कुण्या कुण्या भागात जमिनीवर गवतही उगवत नाही या साठी तुम्हाला या क्षेत्राचे विचार सांगावे वाटतात.पुन्हा विषय मांडतोय आजची शेती ही आता पुर्वी सारखी रहालीच नाही.
भविष्यात शेती कशी राहील हेही माहीत नाही.
आपन आधुनिक शेतीच तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे पण त्या बरोबर जमिन चे घटते प्रमाण व उत्पादनात वाढ करणे महत्त्वाचे आहे.उद्याला आपले पारंपरिक बिज रहाणार च नाही त्याचं कारण नविन संकरीत वाण व त्यामधे जनुकिय बदल होणार त्यामधे समस्या निर्माण होऊ लागेल.आपन आपल्याच शेतकरी मित्राची स्पर्धा करतो कधी कधी आपन गरजेपेक्षा अधिक पाले भाज्या पिकवतो भाव एकदमच कमी होते आणि त्या फळभाज्या कींवा पालेभाज्या रस्त्यावर फेकावा लागतो कारण नाशवंत असतात ठेवताही येत नाही.आपल्या समोर त्या दिवसात एकच पर्याय उरतो की आज शेतीचा व्यवसाय तोट्याचा झालेला आहे.मनात शेती बद्दल नकारात्मक विचार आपन दुसर्यांना सांगत फिरतं असतो. आपल्या शेतकऱ्याला समाधानकारक उत्पन्न मिळू शकत नाही. अनिश्चित पावसामुळे शेती च वेळापत्रक कोलमडून जाते.
वारंवार पडणारे दुष्काळ आणि भूजलाच्या घटत्या प्रमाणामुळे सिंचन अवलंबून राहता येत नाही. शेतमजूर ही दुर्मीळच होत आहेत. लहान शेतकऱ्याला यंत्रसामुग्री आणि कुशल मनुष्यबळ परवडत नाही.
त्या मधे पावसाळ्यात पाऊस कमी झाला तरी शेतकऱ्याला समस्या आणि जास्त झाला, तरीही समस्या आहेच.शेती मधे जास्त खर्च हा या खतांवर होत असतो. या खतांची उपलब्धताच शेती उत्पादनावर परिणाम करते. कमी प्रमाणात जर खतांची उपलब्धता कि शेतीच्या उत्पादन घट आली म्हणून समजा. वेगवेगळ्या प्रकारचे रोग सध्या पिकांवर हल्ला करत आहेत.
त्यावेळी पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याला या कीटकनाशकांचा वापर हा हमखास करावा लागतो अश्या अनेक समस्या निर्माण होतात तरी या समस्येला तोंड द्यायचे धाडस फक्त शेतकरी यांच्यातच आहे.
आता शेवटचा सांगतोय मित्रांनो तुमच्या जवळ जे शेती आहे त्याचा योग्य वापर करा, त्यातुन ज्ञान मिळवा, तुमची कसब विकसित करा, आपले चांगले संबंध दुसर्या शेतकरी मित्राशी वाढवा माल खरीददार तुम्हाला शोधत येतील.
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
milindgode111@gmail.com
Published on: 28 January 2022, 05:55 IST