Agripedia

अलीकडेच रासायनिक बुरशीनाशके ला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशी चा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ लागला आहे. पिकावरील मुळकुज व मर या रोगांचे नियंत्रण ट्रायकोडर्मा बुरशी मुळे करता येते. ट्रायकोडर्मा च्या दोन प्रजाती वापरात आहेत.

Updated on 17 February, 2022 12:44 PM IST

अलीकडेच रासायनिक बुरशीनाशके ला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशी चा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होऊ लागला आहे. पिकावरील मुळकुज व मर या रोगांचे नियंत्रण ट्रायकोडर्मा बुरशी मुळे करता येते. ट्रायकोडर्मा च्या दोन प्रजाती वापरात आहेत.

एक म्हणजे  ट्रायकोडर्मा हरजियनम व दुसरी ट्रायकोडर्मा व्हिरिडीहे होय. त्यांचे संवर्धन 250 ग्रॅम आणि एका किलो पाकिटाच्या स्वरूपात बाजारात मिळते.

 ट्रायकोडर्मा ची कार्यपद्धती

 सर्वप्रथम ट्रायकोडर्मा बुरशी हानीकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरते व त्यातील पोषकद्रव्ये शोषून फस्त करते. परिणामी अपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो.या बुरशीची वाढ जलद गतीने होते. त्यामुळे अन्नद्रव्ये शोषणासाठी ही बुरशी स्पर्धा करते. अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारे कर्ब, नत्र, विटामिन ची कमतरता होऊन हानिकारक बुरशीची वाढ खुंटते.तसेच ट्रायकोडर्मा बुरशीग्यायोटॉक्सिनव व्हीरीडीन नावाचे प्रतिजैविके निर्माण करते. ही प्रतिजैविक रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरतात. तसेच या बुरशीचे कवक तंतू रोपाच्या मूळावर पातळ थरात वाढतात व त्यामुळे रोगकारक बुरशीचा कवक  तंतू मुळांमध्ये प्रवेश करू शकत नाही.

 ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत

  • बीजप्रक्रिया- ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयोग त्याची पद्धत म्हणजे बीजप्रक्रिया हे होय. पेरणीच्या वेळी चार ग्रॅम या प्रमाणात एक किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडर ची बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखे थर होईल याची काळजी घ्यावी. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
  • माती प्रक्रिया- जमिनी मार्फत होणाऱ्या रोगजन्य बुरशींच्या नियंत्रणासाठी एक ते अडीच किलो ट्रायकोडर्मा भूकटी पंचवीस ते तीस किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून एक हेक्टर क्षेत्रात पसरून मातीत मिसळावे व शक्य असल्यास पाणी द्यावे.

 ट्रायकोडर्मा बुरशी चे फायदे

  • नैसर्गिक घटक असल्यामुळे या वर्षीचा पर्यावरणावर कोणताच परिणाम होत नाही.
  • जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या तसेच जमीन सुधारण्यात मदत होते.
  • बीजप्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढवून बीजांकुरण जास्त प्रमाणात होते.
  • आणि कारक तसेच रोगकारक बुरशीचा संहार करते.
  • पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत पर्यंत संरक्षण करते.
  • किफायतशीर असल्याने खर्च कमी येतो.

जिवाणू संवर्धन

जिवाणू खत संपूर्ण सेंद्रिय व सजीव असून त्यामध्ये कोणत्याही अपायकारक, टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नाही. हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जिवाणू खते म्हणतात. जिवाणू संवर्धन म्हणजे जिवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाची मिश्रण असते.

 लेखक

 जैविक शेतकरी

 शरद केशवराव बोंडे

English Summary: tricoderma is best option to chemical fungicide to use in crop treatment
Published on: 17 February 2022, 12:44 IST