Agripedia

अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशीचा उपयोग

Updated on 18 October, 2022 1:37 PM IST

अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशीचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होवू लागला आहे . पिकावरील मुळ कुजवा व मर या रोगाचे नियंत्रण ट्रायकार्डमा बुरशीमुळे करता येते .ट्रायकोडर्माची कार्यपध्दती :- सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते व त्यातील पोषक द्रव्ये शोषून फस्त करते . परिणामी

अपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो . या बुरशीची वाढ जलद गतीने होते .The growth of this fungus is fast.त्यामुळे अन्नद्रव्य शोषणासाठी ही बुरशी स्पर्धा करते .

ट्रायकोडर्मा -एक नैसर्गिक रोगनाशक बुरशी

अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारे , कर्ब , नत्र , व्हिटॅमिन इत्यादीची कमतरता होऊन हानिकारक बुरशीची वाढ खुंटते .तसेच ट्रायकोडर्मा बुरशी ग्यायोटॉक्झीन व व्हिरीडीन नावाची प्रती जैविके निर्माण करते . ही प्रती जैविक रोगजन्य बुरशीच्या

वाढीला मारक ठरतात , तसेच या बुरशीचे कवकतंतू रोपाच्या मुळावर पातळ थरात वाढतात व त्यामुळे रोगकारक बुरशीचे कवक तंतू मुळामध्ये प्रवेश करू शकत नाही .ट्रायकोडर्मा वापरण्याची पध्दतः१ ) बीज प्रक्रिया – ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पध्दत म्हणजे बीज प्रक्रिया पेरणीचे वेळी ४ ग्रॅम या प्रमाणात १ किलो बियाण्यास

ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखे थर होईल याची काळजी घ्यावी . बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी .२ ) माती प्रक्रिया – जमिनीमार्फत होणाऱ्या रोगजन्य बुरशीच्या नियंत्रणासाठी १ ते २ . ५ किलो ट्रायकोडर्मा भुकटी २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून एक हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावे व शक्य असल्यास पाणी द्यावे .

ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे:- नैसर्गिक घटक असल्यामुळे या बुरशीचा पर्यावरणावर कोणताच परिणाम होत नाही .प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी .जमिनीत सेंद्रीय पदार्थ कुजवून देण्यास तसेच जमीन सुधारण्यात मदत होते .बीज प्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढवून बीज अंकुरण जास्त प्रमाणात होते .हानिकारक / रोगकारक बुरशीचा संहार करते .पिकाचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते .किफायतशीतर असल्याने खर्च कमी होतो .

English Summary: Trichoderma - a natural pathogenic fungus
Published on: 17 October 2022, 02:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)