1. कृषीपीडिया

पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड

ट्रायकोग्रामा हे परजीवी किटक असून ते पतंग वर्गीय किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे किडीचा अंडी अवस्थेमध्येच नाश होतो. ट्रायकोग्रामा वापराने त्याचा वातावरणात व इतर मित्र किटकांवर विपरीत परिणाम होत नाही.

KJ Staff
KJ Staff


ट्रायकोग्रामा हे परजीवी किटक असून ते पतंगवर्गीय किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे किडीचा अंडी अवस्थेमध्येच नाश होतो. ट्रायकोग्रामा वापराने त्याचा वातावरणात व इतर मित्र किटकांवर विपरीत परिणाम होत नाही. ट्रायकोग्रामा प्रौढ स्वतः हानिकारक किडींची अंडी शोधून नष्ट करतो. त्याचबरोबर स्वतःची पुढची पिढी त्या जागेवर वाढवितो त्यामुळे ही पद्धत स्वयंप्रसारित व स्वयंउत्पादीत आहे. ट्रायकोग्रामाच्या वापराने किटकनाशकाच्या तुलनेत पिक संरक्षणावर कमी खर्च होतो. हानिकारक किडींचे प्रभावी नियंत्रण होते.

ट्रायकोकार्डचा वापर ऊस, कापूस, मका, सूर्यफूल, भात, टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांमध्ये करता येतो. सद्या काही प्रमाणात सदरील ट्रायकोकार्ड हे परोपजिवी किटक संशोधन योजना, किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्रती कार्ड रु. 100/- प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कार्डचा वापर प्रती एकरी पिकानुसार 2 ते 3 या प्रमाणात लावावेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क करा
परोपजीवी किटक संशोधन योजना, किटकशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
डॉ. सौ. एस. एस. धुरगुडे 8830776074
श्री. जी. एस. खरात 7498729859

English Summary: Trichocard for the control of moth pests Published on: 05 December 2019, 08:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters