Agripedia

महाराष्ट्र मध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो एक महत्त्वाचे पीक असून शेतकर्यांना कमी वेळेत चांगला नफा देण्याची क्षमता या पिकात आहे. परंतु टोमॅटो लागवड करणे आधी आपल्याला त्याची रोपवाटिका तयार करणे गरजेचे असते. बरेच शेतकरी रोपवाटिकेतून रोपे विकत आणून टोमॅटोची लागवड करतात.

Updated on 14 August, 2022 12:42 PM IST

 महाराष्ट्र मध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो एक महत्त्वाचे पीक असून शेतकर्‍यांना कमी वेळेत चांगला नफा देण्याची क्षमता या पिकात आहे. परंतु टोमॅटो लागवड करणे आधी आपल्याला त्याची रोपवाटिका तयार करणे गरजेचे असते. बरेच शेतकरी रोपवाटिकेतून रोपे विकत आणून टोमॅटोची लागवड करतात.

परंतु असे न करता तुम्ही घरच्या घरी योग्य व्यवस्थापनाने टॉमेटोचे रोप वाटिका तयार केलीतर त्या माध्यमातून भविष्यात येणारे टोमॅटोचे उत्पादन नक्कीच भरघोस पद्धतीने मिळेल यात शंका नाही. या लेखात आपण टोमॅटो रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Crop Tips:बाजारपेठेत कमी प्रमाणात दिसणाऱ्या 'या' भाजीपाला पिकाची लागवड 55 ते 60 दिवसात देईल शेतकऱ्यांना भरघोस नफा

 टोमॅटो रोपवाटिका व्यवस्थापन

1- टोमॅटो रोप वाटिका तयार करताना समजा तुम्हाला एक हेक्‍टर क्षेत्रात टोमॅटो लावायचे असेल तर त्यासाठी तीन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही यामध्ये टोमॅटोच्या संकरित वाणांचा विचार केला तर 125 ग्रॅम बियाणे एका हेक्‍टरसाठी पुरेसे ठरते.

2- ज्या जमिनीत रोपवाटिका टाकायचे आहे, ती जमीन दोन वेळा उभी-आडवी नांगरून व चांगल्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.

3- एक मीटर बाय तीन मीटर बाय 15 सेंटिमीटर आकाराचे व्यवस्थित गादीवाफे तयार करून प्रति वाफ्यात पाच किलो कुजलेले शेणखत, 80 ग्राम 19:19:19 किंवा 100 ग्रॅम 15:15:15 चांगले मिसळून घ्यावे.

 अगोदर बीजप्रक्रिया आहे महत्वाची

1- यासाठी थायरम तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा अडीच ग्रॅम प्रति किलो आणि त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर अडीच ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. हे केल्याने टोमॅटोवर भविष्यात येणारे मररोग, रोपे कोलमडणे इत्यादी समस्या निर्माण होत नाही.

नक्की वाचा:Brinjal Nursery: घरच्या घरी वांग्याची रोपवाटिका तयार करण्यासाठी वापरा 'ही' पद्धत,मिळेल दर्जेदार उत्पादन

2- बीज प्रक्रिया केल्यानंतर जेव्हा बी टाकाल तेव्हा त्यासाठी खुरप्याने किंवा हाताने 10 सेंटिमीटर अंतरावर ओळी( रेषा) पाडून घ्याव्यात व त्यामध्ये एक सेंटिमीटर अंतरावर एक बी टाकावे. हे केल्यानंतर पाट पाणी न देता झारीने हलकेच पाणी द्यावे व नंतर गादीवाफे एखाद्या आच्छादनाने व्यवस्थित झाकून घ्यावेत. साधारणतः पाच ते आठ दिवसांमध्ये बियांची उगवण होते व उगवल्यानंतर आच्छादन काढून टाकावे.

3- जेव्हा पाण्याचे व्यवस्थापन कराल तेव्हा  जमीन कशी आहे म्हणजे तिचा मगदूर कसा आहे, हे पाहून पाण्याचे व्यवस्थापन करावे. रोपांची उगवण झाल्यानंतर जर एखाद्या नायलॉनच्या जाळीने ती झाकून घेतली तर किडींचा प्रादुर्भाव फार कमी होतो.

4- जेव्हा रोपे चार ते सहा पानांवर येतात तेव्हा त्यांची पुनर्लागवड करावी. म्हणजेच रोपांचा कालावधी पंचवीस ते तीस दिवसांचा झाल्यानंतर उपटून त्यांची पुनर्लागवड करणे उत्तम ठरते.पुनर्लागवड करण्याआधी एक दिवसरोपांना पाणी द्यावे.

नक्की वाचा:Crop Management: 'या' 8 बाबींची काळजी म्हणजे भरघोस दोडका उत्पादनाची खात्रीशीर हमी,वाचा सविस्तर माहिती

English Summary: tommato nursery in a key of more production from tommato crop
Published on: 14 August 2022, 12:42 IST