Agripedia

1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस( एम्ररल्ड 20 किलो/एकर )चा वापर करावे। DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे

Updated on 26 November, 2021 8:20 PM IST

2 बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे।

  1. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट

( इकोजंण्ट ड्रिप 2 लिटर/एकर )

  ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते

  1. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये।
  2. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे।
  1. तोडे चालू झाल्यास 00:52:34, पोटॅशियम सोनेट, 13:40:13, आणि 00:00:50 आलटून पालटून वापरावे।
  2. फुल धारणे पासून कॅल्शियम नायट्रेट दर 10 ते 12 दिवसांनी द्यायचा। कॅल्शियम ची कमतरता असल्यास फळाच्या बुडाला काळा डाग येत असतो।
  3. कॅल्शियम दिल्यानंतर पुढच्या पाण्यात बोरान नक्की देणे। तसा केल्यास कॅल्शियम अपटेक मध्ये पण मदत होते व फुलगळ पण थांबते।
  4. मॅग्निशियंम दर 10 ते 12 दिवसांनी दिल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणा मध्ये पण वाढ होते।
  5. दर 20 ते 25 दिवसांनी मायकोरायझा ( VAM ) 100 ग्राम/एकर सोडल्यास पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होते।
  6. दर अमावस्येला प्रति एकर निमास्टीन 1 किलो + ट्रायकोडरमा 1 लिटर + गूळात वेगवेगळे रात्रभर भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी एकत्र करून ड्रीप मधून द्यावे, त्याने निमातोड ,मर व जमिनीतील हानिकारक बुरशी वर चांगला नियंत्रण मिळते।
  1. लागवडी च्या दुसऱ्या आठवड्या पासून प्रति एकर सुडोमोनास( सोल्जर 1लिटर) आणि

बॅसिल्लस( रिवो 1 लिटर) आलटून पालटून दर आठवड्याला देत राहिला तर सर्व बुरशीं पासून चांगला सौंरक्षण मिळते व फवारणीचे खर्च पण मोठ्या प्रमाणात वाचतो। हे पद्धत अवलंबत असाल तर ड्रीप मधून बुरशीनाशक देणे टाळावे।

  1. मिक्स मायक्रोन्यूट्रिएन्ट

( नेक्टर ड्रिप 2.5 लिटर/एकर) दर 20 ते 25 दिवसांनी द्यावे 

  1. भुरी चे नियंत्रण साठी स्कोर -0.5 मिली/लिटर व रिवो-5 मिली/लिटर ची फवारणी घेतल्यास उत्तम नियंत्रण मिळेल
  2. लागवडीचे अंतर ज्यास्त ठेवल्यास हवा खेळती राहून करपा आणि अळी चा प्रादुर्भाव कमी होतो।
  3. झाडात पोटॅश चा प्रमाण व्यवस्तीत असल्यास भुरी चा प्रादुर्भाव कमी होतो व लाल कोळी असल्यास नियंत्रण सोपा जाते।
  4. फुलगळ थांबवायचा असल्यास ड्रीप मधून स्फुरद द्यावे आणि फवारणी मध्ये चिलेटेडे कॅल्शियम व बोरान चा वापर करावा।
  1. टोमॅटो मध्ये शेंडा खुडने (टॉपिंग) टाळावे। ते केल्यास व्हायरस वाढायची शक्यता ज्यास्त होते।
  2. व्हायरस चे लक्षण दिसताच व्हायरस च्या औषध सोबत ताक वापरावे। ताकातील प्रोटीन व्हायरस सोबत मिक्स होऊन त्यांची उत्पत्ती नियंत्रनात येते.

विनोद धोंगडे

मो.नं.9923132233 

मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)

English Summary: Tomato schedule planning.
Published on: 26 November 2021, 08:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)