Agripedia

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य होऊन बसले आहे. कधी अवकाळी कधी गारपीट कधी ढगाळ वातावरण तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर या अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे.

Updated on 30 March, 2022 2:35 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य होऊन बसले आहे. कधी अवकाळी कधी गारपीट कधी ढगाळ वातावरण तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर या अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आला आहे. आपल्या शेतकरी बापाची ही अवस्था पाहून अनेक शेतकरी पुत्र शेतीकडे पाठ फिरवित आहेत. यामुळे शेतकरी पुत्रांनी आता शेती करण्याऐवजी नोकरी करण्यास विशेष प्राधान्य दिले आहे. मात्र, शेतकरी पुत्रांनी शेतीमध्ये योग्य नियोजन केले तर शेती मधूनही लाखोंचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो आज आपण अल्पकालावधीत उत्पादन देण्यास तयार होणाऱ्या टोमॅटो पिकाच्या लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. टोमॅटोची शेती जर नियोजनबद्ध पद्धतीने केली तर निश्चितच यातून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते.

टोमॅटोची लागवड या जमिनीत करा- टोमॅटोची लागवड काळी माती असलेल्या जमिनीत घेतले जाऊ शकते. याशिवाय चिकणमाती, वालुकामय चिकणमाती आणि लाल चिकणमाती असलेल्या जमिनीत देखील याची लागवड यशस्वीपणे केली जाऊ शकते. असे असले तरी, टोमॅटोच्या लागवडीसाठी चिकणमाती असलेली जमीन सर्वोत्तम मानली जाते. मात्र, हलक्या जमिनीत देखील टोमॅटोची लागवड केली जाऊ शकते, तसेच टोमॅटो पिकातून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते. या पिकातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी, मातीचा pH 7 ते 8.5 यादरम्यान असावा असा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात.

टोमॅटो पिकासाठी पाणी व्यवस्थापन:- शेतकरी मित्रांनो जर आपण उन्हाळ्यात टोमॅटो पिकाची लागवड करत असणार तर या पिकाला 6 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी देणे विशेष फायद्याचे ठरणार आहे. मात्र जर आपण हिवाळ्यात टोमॅटोची लागवड करत असाल तर 10-15 दिवसांच्या अंतराने पाणी देणे देखील पुरेसे ठरू शकते. टोमॅटोच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी पिकाची वेळोवेळी निंदणी अर्थात तण काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पूर्वमशागत आणि टोमॅटो लागवडीची पद्धत:- टोमॅटो शेतीत पूर्वमशागत महत्त्वाची ठरते. पिकाची लागवड करण्यापूर्वी 3 ते 4 वेळा नांगरणी करून शेत चांगले तयार करावे पहिली नांगरणी ही नेहमी माती फिरवणाऱ्या मोठ्या नांगराने करावी. शेत चांगले नांगरून झाल्यानंतर 250-300 क्विंटल प्रति हेक्टर या प्रमाणात कुजलेले शेणखत शेतात टाकावे. मग शेती जमीन चांगली समतल करून घ्यावी आणि शेतातलं तण पूर्णपणे काढून टाकावे. यानंतर टोमॅटोची रोपे 60 ते 45 सें.मी.च्या अंतरावर लावावीत.

किती कमाई होऊ शकते?- टोमॅटोची लागवड योग्य पद्धतीने केल्यास या पिकातून चांगली मोठी कमाई होऊ शकते. टोमॅटो पिकाच्या एक हेक्टर क्षेत्रातुन 800-1200 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवता येणे शक्य असते. टोमॅटोचे अनेक जाती आहेत. विविध जातींनुसार टोमॅटोचे उत्पादन कमी जास्त होऊ शकते. टोमॅटो बाजारात नेहमी सरासरी 10 रुपये किलोच्या दराने विकला जातो, टोमॅटोचे दर फारसे वाढत नाहीत. अशा पद्धतीने आपण 1000 क्विंटल टोमॅटो उत्पादन काढले तरी देखील हेक्टरी 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. हा फक्त अंदाज आहे यामध्ये कमी-जास्त होऊ शकतो.

संबंधित बातम्या:-

खरं काय! पॉलिहाऊस शेतीकडे शेतकऱ्यांनी वळवला मोर्चा; महाराष्ट्र शासन पण देते तब्बल 50 टक्के अनुदान

मोठी बातमी! मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी एक मेगाप्लॅन; लवकरच लॉन्च होणार एक सुपर ॲप; या अप्लिकेशन मध्ये असतील सर्व सुविधा

लई भारी मशीन! 'या' मशीनचा वापर करून शेतजमीन केली जातेय भुसभूशीत; वाचा याविषयी

English Summary: tomato farming is helping farmers start tomato farming and earn big profit
Published on: 30 March 2022, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)