Agripedia

टोमॅटो हे रोजच्या खाण्यात रोजच्या भाजीत वापरण्यात येणारी फळभाजी आहे. देशात दररोज हजारो क्विंटल टोमॅटोचा उपयोग होतो. टोमॅटोपासून इतर खाद्य पदार्थही बनवली जातात यामुळे टोमॅटोला बारमाही मागणी असते. त्यामुळे टोमॅटो हे पीक खरीप रब्बी आणि उन्हाळी या हंगामातही घेण्यात येते. त्यामुळे बाजारात बाराही महिने टोमॅटोची आवक असल्याचे दिसून येते.

Updated on 20 May, 2020 7:50 PM IST


टोमॅटो हे रोजच्या खाण्यात रोजच्या भाजीत वापरण्यात येणारी फळभाजी आहे. देशात दररोज हजारो क्विंटल टोमॅटोचा उपयोग होतो. टोमॅटोपासून इतर खाद्य पदार्थही बनवली जातात यामुळे टोमॅटोला बारमाही मागणी असते. त्यामुळे टोमॅटो हे पीक खरीप रब्बी आणि उन्हाळी या हंगामातही घेण्यात येते. त्यामुळे बाजारात  बाराही महिने  टोमॅटोची आवक असल्याचे दिसून येते.  मग अशा स्पर्धेच्या फळभाजीमध्ये आपला माल ग्राहकांना कसा आर्कषित करेल ? आहे ना प्रश्न, यावर एक उत्तर आहे, ते म्हणजे जर आपल्या टोमॉटोची गुणवत्ता. गुणवत्ता  चांगली असली तर आपल्या मालाला नक्कीच दरही चांगला मिळतो आणि ग्राहकही.  सगळेच शेतकरी टोमॉटोची शेती करताना मग आपलं उत्पन्न कसं अधिक होईल किंवा आपला माल कसा अधिक गुणवत्तापूर्ण असेल याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. टोमॉटो लागवड आणि त्यांचे व्यवस्थापन चांगले केले तर टोमॉटो शेतीत भरपूर उत्पन्न मिळते यात शंका नाही. आज आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.

टोमॅॉटो पिकाची लागवड -

टोमॉटो पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उत्तम निचरा होणारी काळी मध्यम प्रतीची जमीन निवडावी. यात सर्वप्रथम शेताची उभी व आडवी नांगरट करून घ्यावी. त्यानंतर या शेतात रोटर मरून घ्यावे जेणेकरून जमीन भुसभूशीत होईल. त्यांनतर शेतात सात फूट अंतरावर बेड तयार करून घ्यावे. यांनतर २४-२४-०९, १०-२६-२६, १४-३५-१४, २०-२०-०१३, निंबोळी पेंड, दाणेदार सुपर, बोरोकोल या सर्व खतांचे मिश्रण तयार करून बेडवर टाकावे व वरून मलचींग पेपर टाकून घ्यावा. ठिबक सिंचन अंथरूण प्रत्येकी एक फुटावर झिक झॅक पद्धतीने टोमॉटो रोपांची लागवड करून घ्यावी. त्यासाठी बिंजो सीडस वीर या वाणाची निवड करावी. तसेच लागवड करताना १ एकरमध्ये ६०००-७००० रोपांची लागवड करावी.

 


लागवडीनंतर घ्याची काळजी -

टोमॉटोची लागवड झाल्यानंतर ७ दिवसांनी ह्यूमिक अॅसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा डोस द्यावा. तसेच १५ दिवसांनंतर बुरशीनाशकांचा डोस द्यावा किंवा त्याची फवारणी करावी जेणेकरून झाडाचा बुरशी पासून बचाव होईल. याच दरम्यान झाडांना ठिबकद्वारे पाणी देण्यात यावे. ही झाडे साधारण एक महिन्याची झाल्यानंतर त्यांना आधाराची गरज असते. त्यासाठी मंडप तयार करावा.

मंडप तयार करताना बांबू आणि तारांचा वापर करावा. मंडप मजबूत होण्यासाठी ठिकठिकाणी लाकडांचे ओंडके जमिनीत घट्ट पुरावेत.  त्याच्या आधारे झाडांना सुतुळीने बांधून घ्यावे. यामुळे झाडे एकमेकांत गुंतत नाहीत तसेच फळांची वाढही चांगली होते. मंडप तयार होत असताना झाडांना फळ लागलेले असतात. लागवडीनंतर साधारणतः २ महिन्यांनी फळांची तोडणी सुरू होते. तोडणी करताना फळांची दोन भागांत विभागणी केल्यास फळाला दर चांगला मिळतो आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

English Summary: tomato farming : Farm Management is importatnt to more production 20
Published on: 20 May 2020, 07:45 IST