आपल्या पुस्तकांमधून माहिती मिळते हे खरे आहे. परंतु त्या सर्व गोष्टी सर्वांनाच वेळेवर उपलब्ध होतील असे नाही. तसेच त्या सर्वांनाच समजतील असेही नाही. कारण शेती हा प्रात्यक्षिक विषय आहे. अनेक वेळा आपण शेतात विविध पिकांची लागवड करतो. त्यात काही गोष्टी असतात ज्या नवीन पद्धतीने केल्या जातात. त्यातून काही बदल बघायला मिळतात. काही ठिकाणी मात्र असे होताना दिसत नाही. शेती हा सतत बदलाचा विषय आहे. त्यात नवीन होणारे बदल स्वीकारणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मागच्या वेळी घेतलेले पिक त्यात काही आपण चांगले करतो तर काही बाबतीत काही त्रुटी राहून जातात. ज्यामुळे काही नुकसानास सामोरे जावे लागते.
या सर्व गोष्टी अभ्यासाच्या आहेत एका वेळी झालेली नुकसानी गोष्ट नंतरच्या वेळी टाळता आली पाहिजे. तेव्हा तो भाग होतो अभ्यासपूर्वक शेती करण्याचा.
शेतीमध्ये अनेक प्रकारचे बदल हे काळानुसार स्वीकारले गेले पाहिजे. वातावरणात अचानक होणारे बदल त्यामुळे होणारे नुकसान या गोष्टी आज नाही होत आहेत. सातत्याने या बाबी होत आल्या आहेत आणि अजूनही होतच आहेत. यावर काहीतरी अभ्यासपूर्वक उपाय शोधणे हे तुम्हा आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या घडवणे आपण टाळू शकत नाही. जे आपल्या हातातले आहे त्यात मात्र आपण बदल निच्छितच करू शकतो. होणारे नुकसान टाळू शकतो किंबहुना होणाऱ्या नुकसानीचा दाह कमी करू शकतो.
निसर्ग आपल्याला मात देऊन शकते आपन निसर्गाला नाही.
शेतीत विविध शेती पद्धती आहेत त्यात बागायती शेती, कोरडवाहू शेती इत्यादी. तसेच विविध प्रकार आहेत शेतीचे त्यामुळे योग्य त्या गोष्टीची निवड झाली पाहिजे. फळबागा लागवड वाढवली पाहिजे. बरेच असे फळबागा आहेत जे कुठल्याही जमिनीत येवू शकतात व चांगले उत्पादन देखील देवू शकतात. त्यामध्ये नगदी पिके घेता येतात.
एखाद्या पिकाचे वातारण किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाले तर दुसऱ्या पिकाचे उत्पादन मिळेल अशा रीतीने शेती पद्धतीत बदल होणे ही सर्वांसाठी महत्त्वाचे बनले आहे.
milindgode111@gmail.com
Milind j gode
Published on: 24 December 2021, 04:01 IST