दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे तर शेत जमीन कमी होत चालली आहे. अश्यावेळेस नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही शेती व्यवसायात अधिक नफा मिळवू शकता.आधुनिक काळात जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर व्हर्टिकल फार्मिंग हा सर्वोत्तम उपाय आहे.
व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे नेमकं काय तर कमी जागेत एका वर एक थराचे नियोजन करून केली जाणारी शेती होय.
कित्येक जण अतिशय कमी जागेत बाल्कनीमध्ये , टेरेसवर विविध भाजीपाला पिकवतांना दिसतात. मुख्यतः हळदीचे पीक व्हर्टिकल फार्मिंगमध्ये घेणे फायद्याचे ठरते.
व्हर्टिकल फार्मिंगचे अनेक फायदे आहेत. कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते. त्यापासून अधीक उत्पन्न मिळवता येते.ज्या वातावरणात पीक घेणे कठीण होते अश्या ठिकाणी व्हर्टिकल फार्मिंग चा वापर करून शेती करणे शक्य आहे. व्हर्टिकल फार्मिंग ची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
व्हर्टिकल फार्मिंगचे फायदे
व्हर्टिकल फार्मिंग ची शेती कमी मातीत देखील करता येत असून यासाठी कीटकनाशकांची गरज भासत नाही. इतकेच काय तर वीज, पाणी , माती यांसारख्या समस्या टाळता येतात. व्हर्टिकल फार्मिंग मध्ये भाज्यांबरोबर औषधी वनस्पतींची देखील लागवड करता येते.
कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते. वाहतूक , मजूर , वेळ यांची बचत होते तर पाण्यासह इतर बाबींचाही पुनर्वापर करता येते.
वर्षभर हंगाम नसतांना ही पिकाची लागवड करता येते. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीची बचत मोठ्या प्रमाणावर होते एका एकर मध्ये सुमारे ४ ते ५ एकर इतके पीक घेता येते. पडीक इमारतीतही व्हर्टिकल फार्मिंग करता येते. खनिजद्रव्य पाण्यामध्ये पिकांची वाढ केल्याने पीक चांगले व निरोगी येते.
Published on: 08 March 2022, 10:57 IST