शेती करायचे अगोदर मला हे सांगीतल्या गेले की.प्रमाने शेती केल्यास उत्पादन खर्च शुन्य होतो.मग आता एक प्रश्न पुन्हा माझ्या मनात उपस्थीत झाला.
जीकडे तीकडे विषमुक्त अन्नधान्य च्या नावावर आपआपले प्रॉडक्ट विकने चालु आहे व सोबतच एक वाक्य पन कुठे कुठे दीसतयं.की खाने असेल तर खा नाही तर बीमारीने मरा.मग अशात विषमुक्त चा भाव रासायनीक च्या मालाच्या डबल पेक्षा ही जास्त.कीतपत योग्य ग्राहकाला वेठीस धरने.बरं आणि एवढ्या जास्त दरात खरेदी करनारा एक स्पेशल वर्ग राहील,मग अशात गरीबाचा विचार कुठे झालेला दीसत नाही.
जे विषमुक्त खायचं असं ठरवतात त्यांना हे तरी माहीती आहे का की फक्त विषमुक्त खाल्ल्याने आपल्या शरीरामधले विष कमी होईल का.कशा कशाने आपल्या शरीरात विष तयार होते यावर कधी विचार केला का.जर विषमुक्त पीकविनार्या शेतकर्याचा उत्पादन खर्च शुन्य होत असेल तर मग दुपटीपेक्षा जास्त भावाने आपले प्रॉडक्ट विकायची गरज काय?जो माल आपन घेतोय तो
१००% नैसर्गिक विषमुक्तच याची गँरंटी काय?एकंदरीत मानुस मरायला घाबरतो व त्याचाच फायदा या माध्यमातुन घेतला जातो असेच मला वाटते.
पन जे ग्राहक विषमुक्त माल आपल्या दैनंदीन जीवनशैलीत वापरायचा विचार करीत असतील त्यांना सांगावेशे वाटते की.
फक्त विषमुक्त खाल्ल्याने शरीरातील विष कमी होनार नाही.कारन त्या साठी आपल्याला पुर्न जीवनशैलीच बदलवावी लागते कारन या हवेत,पान्यात,टेंशन,ग्लोबल वार्मींग,ध्वनीप्रदुशन व बरेच काही.या सर्वामधुन आपल्या शरीरात विष तयार होते.मग अशावेळी फक्त विषमुक्त खाल्ल्याने कीतपत फायदा आपल्याला होउ शकतो.
जर विषमुक्त १००% गँरंटेड आपल्याला मीळत असेलही तरी त्या साठी आपल्याला आपली जीवनशैली सुध्दा बदलवावी लागेेल तेव्हाच या विषमुक्त अन्नधान्य भाजीपाल्याचा आपल्या शरीराला फायदा होईल,नाही तर फक्त आपल्याला एवढेच समाधान राहील की आपन विषमुक्त आहार घेतलाय. पन या सोबतच विकनार्यांनी पन विचार करावा की ज्या उत्पादनाचा उत्पादन खर्च शुन्य आहे त्याला आपन मार्केटपेक्षा डबल भावाने विकायचे कशे...व ...का? एकंदरीत शेतकर्यांनी विकायचे वेळेस व ग्राहकांनी विकत घ्यायचे वेळेस या सर्व बाबींचा विचार करावा.
१५ ते २०%जास्त घ्यायला कींवा जास्त द्यायला हरकत नसावी पन तेही १००% नैसर्गिक विषमुक्त असेल तरच.
मी वास्तविकता मांडन्याचा प्रयत्न केला,कुनाचे मन दुखले असेल तर मी दीलगीरी व्यक्त करतो.
राहुल साहेबराव उभाड
Rahul4patil1212@gmail.com
Published on: 09 January 2022, 02:22 IST