भारतात अन्नधाण्याची मागणी ही सर्वात जास्त असते. त्यामुळे भारतात गहु, तांदूळ, ज्वारी, बाजरी ह्या पिकांची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि शेतकरी बांधव ह्या पिकांच्या लागवडीतून चांगले उत्पन्न कमवितात. बाजरी हा एक धान्याचा प्रकार आहे. ज्यामध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. भारतातील अनेक राज्यांमध्ये बाजरीची लागवड केली जाते, ज्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश होतो.
. आपल्या महाराष्ट्रात देखील बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि बाजरीचे लागवडिखालील क्षेत्र देखील लक्षणीय आहे. महाराष्ट्रात बाजरीच्या भाकरी ग्रामीण भागातील प्रमुख आहरापैकी एक आहे. बाजरीची भाकर ही शरीरासाठी खुप पौष्टिक असते त्यामुळे बाजरीच्या भाकरीचे सेवन हे आता फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात केले जाते आणि ह्यामुळे बाजरीला खुप मोठ्या प्रमाणात बाजार उपलब्ध आहे त्यामुळे जर शेतकरी बांधवांनी बाजरीची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली तर बाजरीच्या पिकातून चांगली बक्कळ कमाई करू शकतात.
बाजरी हे देशातील शेतकऱ्यांसाठी अनुकूल पिकांपैकी एक आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बाजरी हे भारतातील एक असे पीक आहे, ज्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्याच्या लागवडीकडे मोठा कल आहे. पण कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि उत्पन्नासाठी, त्या पिकाच्या योग्य वाणांची निवड करणे आवश्यक असते, त्यामुळे आज आम्ही आपणांस बाजरीच्या काही प्रगत जातींबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला जास्त उत्पन्न मिळवून देईल आणि तुम्ही सुद्धा बाजरी लागवडीच्या विचारात असाल तर बाजरी लागवड करून आपण भरपूर फायदा मिळवू शकता.
शेतकरी मित्रांनो आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की अलीकडेच भारतीय कृषी संशोधन (ICAR) ने बाजरीच्या काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. या जातीमध्ये 80 ते 90 पीपीएम लोह आणि 40 ते 50 पीपीएम जस्ताची मात्रा आहे, आणि एवढेच नाही तर, विशेष गोष्ट अशी आहे की ह्या जाती 30 ते 35 क्विंटल बाजरी आणि 70 ते 80 क्विंटल चारा प्रति हेक्टर क्षेत्रात मिळवून देण्यास सक्षम आहेत जे इतर जातींपेक्षा खुप जास्त आहे. त्यामुळे ह्या सुधारित जाती बाजरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वरदान म्हणुन काम करेल. चला तर मग जाणुन घेऊया बाजरीच्या ह्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या आहेत.
ICAR द्वारा विकसित केल्या गेलेल्या सुधारित जाती पुढीलप्रमाणे
PB 1877 वाण
पीबी 1877 बाजरीच्या जातीमध्ये लोहाचे प्रमाण 48 पीपीएम आणि जस्तचे प्रमाण 32 पीपीएम आहे. भारत पर्ल बाजरीचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणुन ख्यातीप्राप्त आहे.
या जातीचे धान्य हे गुणवत्तामध्ये इतर बाजरीच्या जातीपेक्षा वरचढ तर आहेच शिवाय उत्पादनात देखील खुप पुढे आहे ह्या जातीच्या बाजरीचे हेक्टरी उत्पादन 4-5 टन पेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे जे की बाजरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरच विशेष बाब आहे.
H H 7 वाण
बाजरीची ही एक सुधारित जात आहे. ह्या बाजरीच्या जातीत लोहची मात्रा ही जवळपास 42 पीपीएम आणि जस्तची मात्रा ही देखील 32 पीपीएमच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही बाजरी इतर बाजरीच्या जातीपेक्षा चवीला खुपच चांगली आहे, आणि हे या जातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे असेच म्हणावे लागेल ह्या जातीच्या बाजरीच्या भाकरी खायला खूप रुचकर असतात.
Published on: 05 October 2021, 10:49 IST