Agripedia

भेंडी लागवड महाराष्ट्र मध्ये फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण भेंडी या भाजीपाला पिकाचा विचार केला तर वर्षभर चांगल्यापैकी बाजारपेठेत दर मिळतात. त्यामुळे शेतकरी बंधू भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.जर आपण भेंडी या पिकाचा विचार केला तर हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक असून भेंडीच्या बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी 20 ते 40 अंश सेल्सियस तापमान असणे गरजेचे आहे.

Updated on 15 October, 2022 5:03 PM IST

 भेंडी लागवड महाराष्ट्र मध्ये फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण भेंडी या भाजीपाला पिकाचा विचार केला तर वर्षभर चांगल्यापैकी बाजारपेठेत दर मिळतात. त्यामुळे शेतकरी बंधू भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.जर आपण भेंडी या पिकाचा विचार केला तर हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक असून भेंडीच्या बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी 20 ते 40 अंश सेल्सियस तापमान असणे गरजेचे आहे.  

 जर 10 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी असेल तर भेंडीची उगवण चांगली होत नाही म्हणून हिवाळ्यात भेंडीची लागवड जास्त प्रमाणात होत नाही. भेंडी हे एक महत्वपूर्ण पीक असून शेतकऱ्यांसाठी देखील एक आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. या लेखात आपण भेंडीच्या काही मोजक्या परंतु चांगल्या जातीची माहिती घेऊ.

नक्की वाचा:Kakdi Lagvad: तुम्हालाही काकडी लागवडीतून हवे असेल भरघोस उत्पादन तर लागवड करा 'या' जातींची आणि वापरा हे तंत्र, मिळेल भरघोस उत्पादन

 भेंडीच्या चांगल्या उत्पादनक्षम जाती

1- पुसा सावनी- ही जात आय.ए.आर.आय.ने विकसित केली असून या जातीची भेंडीची लांबी 10 ते 15 सेंटिमीटर व हिरवी मुलायम असते. झाडावर काटेरी लव असते व देठावर तांबूस छटा असतात. पिवळ्या रंगाची फुले येतात व प्रत्येक फुलांच्या पाकळीवर पिवळा ठिपका असतो. भेंडीचे हे वाण आगोदर येलो मोझक व्हायरसला प्रतिकारक होते. परंतु सध्या व्हायरसला बळी पडत आहे. हेक्‍टरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते.

2- परभणी क्रांती- भेंडीची ही जात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली असून या जातीची फळे सात ते दहा सेंटिमीटर लांब असतात.या जातीची भेंडी पुसा सावनी जातीपेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक आहे.

या जातीपासून मिळणारी भेंडी ही नाजूक व तजेलदार तसेच हिरवेगार असते. लागवड केल्यापासून 55 दिवसानंतर तोडणी करता येते. उन्हाळ्यामध्ये 14 ते 16 तोडे मिळतात तर खरिपात 20 तोडे मिळतात. हेक्‍टरी सात ते आठ टन उत्पादन मिळू शकते.

नक्की वाचा:Water Management: उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 'या' पिकांपासून हवे असेल भरघोस उत्पादन तर अशा पद्धतीने करा पाणी व्यवस्थापन, मिळेल फायदा

3- अर्का अनामिका- या जातीच्या भेंडीचे झाड उंच वाढते व फळे लांब व कोवळी तसेच हिरवीगार असतात. व्हायरस रोगासाठी प्रतिकारक असून भेंडीची तोडणी करणे देखील सोपे आहे. या जातीची भेंडी हेक्टरी 9 ते 12 टनांपर्यंत उत्पादन देते.

4- वर्षा- ही भेंडीची लोकप्रिय जात असून या जातीची भेंडी पाच ते सात सेंटिमीटर लांब असते व हिरवेगार व लुसलुशीत फळे असतात. या जातीच्या भेंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोडल्यानंतर काळी पडत नाही. या जातीच्या भेंडी पासून हेक्‍टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.

6- महिको 10- हे भेंडीची एक सरळ वाढणारी जात असून  फळे जास्त व हिरवीगार असतात. महिको 10 जातीच्या भेंडी पासून हेक्‍टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.

7- अंकुर 40- ही भेंडीची सरळ वाढणारी जात असून तिच्या  पेरामधील अंतर कमी असते व हेक्‍टरी आठ ते दहा टन उत्पादन देते.

नक्की वाचा:Water Management: उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 'या' पिकांपासून हवे असेल भरघोस उत्पादन तर अशा पद्धतीने करा पाणी व्यवस्थापन, मिळेल फायदा

English Summary: to use this process of cultivation of okra crop than get more production
Published on: 15 October 2022, 05:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)