अलीकडे शेतकऱ्यांना भूल भुलिया करणाऱ्या अनेक कृषी निविष्ठा विक्री कंपनीचे प्रतिनिधी रासायनिक ,केमिकल्स च्या मोठं मोठ्या कंपन्या अशा तशा म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना गरज नसताना कोणत्याही पिकाला उलटेसुलटे मार्गदर्शन करून शेतकर्यांच्या शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे उकळवण्याचा धंदा सुरू आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे खरंच आपल्या पिकाला त्या वस्तू ची गरज आहे का ? हवामानाचा ,जमिनीचा व जे पीक आपण करतो आहोत त्या पिकाला कोणत्या वातावरणात त्याची
गरज आहे का हे विचार करण्याची गरज आहे अनेक प्रतिनिधी हे स्वतःची चांगली शेती स्वतःला करता येत नसताना शेतकऱयांना मार्गदर्शन करतात एका प्रकारची बुवा बाजी सुरू केलेली आहे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो फुल गळ होत असताना मधमाशी ची गरज असते व मधमाशी ही निसर्गाने दिलेली देणगी असताना आता ह्या कंपनीचे प्रतिनिधी मधमाशी बागेत येण्याऐवजी ही औषधे फवारली तर ती जवळ येणे तर दूर ती मरून जाण्याचीच शक्यता जास्त आहे.काही औषधी अशी आहेत की ती फवारली तर 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मधमाशी सुद्धा जायबंदी होतात .
काहीवेळा नाहीशा सुद्धा होतात याचेच वाईटही वाटते .तरी पण माझे शेतकरी या गोष्टीला बळी सुद्धा पडतात म्हणून मित्रानो सावध व्हा आपल्याकडे येणारा कंपनीचा प्रतिनिधी हा किती अभ्यासू आहे व त्याच्या स्वतःच्या शेतीची काय अवस्था आहे हे अगोदर समजून घ्या नुसत्या वाकड्या तुकड्या दोन चार शब्द इंग्रजी शब्द बोलून आपल्याला फसवत तर नाही ना हे अगोदर समजून घ्या व तो त्याच्या स्वतः हा कोणत्या कंपनीचा प्रतिनिधी आहे व त्याच्या कंपनीचे औषध आपल्या गळ्यात किती घालतो आहे व त्याची आपल्या पिकाला खरोखर किती गरज आहे व सदर कंपनी
हिचा इतिहास काय आहे हे प्रत्येक शेतकऱ्याने तपासून घेणे गरजेचे आहे व गरज असेल तर नक्की घ्या परंतु आपण आपल्या पिकाचा खर्च व जमा ह्या दोनीही गोष्टीचा आर्थिक ताळेबंद तपासून बघा नाहीतर आपला खर्च जास्त व उत्पन्न कमी असे होता कामा नये कारण आपल्याही पोरा बाळांना काहीही उरेल का कारण अलीकडे भरमसाट महागाई बघता घरातील शैक्षणिक ,वैदयकीय खर्च तसेच घर खर्च हे परवडण्यासारखे नाही हे लक्षात घ्या एकच सांगेल मित्रानो सजग राहा चौकस राहा व शेती करताना अभ्यासू बना अन्यथा अशी वेळ येईल की,शेतकरी माझा हा उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
शेतकरी हितार्थ
विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
9923132233
Published on: 28 June 2022, 08:22 IST