Agripedia

शेतकरी बऱ्याचदा घरासाठी लागणारे जास्तीच्या धान्य साठवूण ठेवतात. परंतु घरामध्ये बऱ्याचदा साठवलेल्या पाण्यामध्ये किडे किंवा बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. हवेतील आद्रता किंवा हवामान बदल त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात.

Updated on 30 April, 2021 1:14 PM IST

शेतकरी बऱ्याचदा घरासाठी लागणारे जास्तीच्या धान्य साठवून ठेवतात. परंतु घरामध्ये बऱ्याचदा साठवलेल्या पाण्यामध्ये किडे किंवा बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. हवेतील आद्रता किंवा हवामान बदल त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात.

या समस्या उद्भवू नयेत म्हणून बरेच उपाय केले जातात असे कीटकनाशकांची फवारणी केली जाते.  परंतु अशा उपायांचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.  तेव्हासाठवणुकीतील धान्य खराब होऊ नयेत यासाठी सोप्या आणि आरोग्याला नुकसान न पोचवणाऱ्या काही टिप्स आपण पाहू.

  • ओलाव्याची काळजी घ्यावी

 जर तुम्हाला डाळ आणि तांदूळ साठवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यामध्ये ओलावा नसावा. जर ओलावा असेल तर धान्य लवकर खराब होऊ शकते.

  • तांदूळ ची सुरक्षितता- जर तांदूळ साठवून ठेवायचा असेल तर त्यामध्ये कोरड्या पुदिन्याची पाने घालावीत. तसेच त्यामध्ये तुम्ही कडूलिंबाचे पाने आणि तिखट घालू शकता.त्यामुळे तांदुळाला कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही.

  • डाळी साठवणुकीसाठी- डाळींची साठवणूक करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा कडुनिंबाची पाने घालावीत. तसेच मोहरीचे तेल टाकल्याने सुद्धा फायदा होतो. हे तेल टाकल्यानंतर उन्हात चांगले वाळवावे.  नंतरकंटेनर मध्ये ठेवावे. म्हणजे डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकते.

हेही वाचा : पिकासाठी कसा कराल विद्राव्य खतांचा वापर , वाचा संपूर्ण माहिती

  • गहू कसा सुरक्षित ठेवावा-बरेच लोक घरी गहू स्वच्छ करतात आणि पोत्यात ठेवतात.गहू बऱ्याच दिवस चांगला राहण्यासाठी त्यामध्ये कांदा टाकला तर तो बरेच दिवस चांगला टिकून राहतो.  यासाठी एक क्विंटल गव्हासाठी  अर्धा किलो कांदे वापरू शकता..  असे केल्याने गहू बराच काळ टिकून राहतो.

  • चांगल्या दर्जाचे धान्य- जर आपल्याला धान्य साठवायचे असेल तर खरेदी करताना चांगल्या दर्जाचे धान्य खरेदी करावे.  चांगल्या दर्जाचे धान्य हे बरेच दिवस टिकून राहते.  त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी धान्य टिकवणे सोपे होते.

  • इतर उपाय- धान्य टिकवण्याचा चांगला मार्ग म्हणजे प्लास्टिक कंटेनर वापरणे हा होय. च्या खोलीमध्ये हा कंटेनर ठेवला असेल ती खोली पुन्हा पुन्हा उघडू नका आणि धान्य खराब झाले आहे का ते दहा ते पंधरा दिवसात तपासावे तसेच साठवण्याची जागा हवेशीर असले पाहिजे.

English Summary: Tips for preserving grain for a long time
Published on: 30 April 2021, 12:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)