मध्यंतरी सोयाबीन पिकाला २०-२२ दिवसाचा ताण बसलेला आहे आणि सद्यपरिस्थितीत सर्वदूर पाऊस पडत आहे त्यामुळे सोयाबीन पीक चांगले बहरले आहे.
परंतु या आठवड्यातील सर्वेक्षण केले असता काही भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोजेक व सोयाबीन मोझॅक (हिरवा विषाणू) रोग सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतामध्ये दिसत आहे. पिवळा मोजेक या रोगामध्ये साधारणता रोगट झाडाचा पानाचा काही भाग पिवळसर दिसून येतो व त्यावर हिरवे पिवळे चट्टे पडतात शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.
या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी द्वारे होतो. हा रोग जर शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला तर उत्पादनात नऊ ते दहा टक्के पर्यंत घट संभवते.
त्याच प्रमाणे काही भागात हिरवा मोजेक विषाणूचा पण प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामध्ये पाने आखूड लहान जाडसर व सुरकुतलेली होते व पानाच्या कडा जमिनीकडे वाकतात. या रोगाचा प्राथमिक प्रसार हा बियाण्यात द्वारे व दुय्यम प्रसार मावा या किडीमुळे होतो.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी या दोन्ही विषाणूजन्य रोगाचे शेतामध्ये निरीक्षण करणे गरजेचे आहे
कारण आपल्या शेतामध्ये प्रारंभिक अवस्थेत जर अशी लक्षणे असलेली झाडे आढळून आली तर ही झाडे उपटून नष्ट करावीत.
वरील रोगा करिता खालील उपाययोजना करावी.
१) प्रारंभिक अवस्थेत काही प्रादुर्भाव ग्रस्त झाडे दिसताच ती उठून नष्ट करावी व खड्ड्यांमध्ये पुरवावी.
२) पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता शिफारशीनुसार बीटा सायफ्लुथ्रीन (८.४८%) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१%) ०.७ मिली
किंवा थायमीथॉक्झाम अधिक लेंबडा सहेलॉथ्रीन ०.२५ मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिवळा मोजेक या रोगामध्ये साधारणता रोगट झाडाचा पानाचा काही भाग पिवळसर दिसून येतो व त्यावर हिरवे पिवळे चट्टे पडतात शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी द्वारे होतो.
Published on: 10 April 2022, 08:56 IST