Agripedia

केळी लागवड व व्यवस्थापन कशा प्रकारे करावे लावडीसाठी फेब्रुवारी महिना उत्तम ठरतो कारण वेगाने वाहणारे वारे गारपीट पिकांवर होणारे विपरीत परिणाम.या सगळ्यांनचा विचार करून त्यांची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी.कारण यामुळे केळी झाड वाढीसाठी हा काळ चांगला आहे जास्त करून केळीच्या झाडावर पणामा रोग शेंडे झोका यांसारखे हानिकारक रोग केळीच्या झाडांना पडतात त्यामुळे त्याची अति काळजी घेणे गरजेचे आहे त्यानुसार औषध फवारणी वगैरे देणे गरजेचे आहे.

Updated on 21 June, 2021 5:39 PM IST

केळी (banana)लागवड व व्यवस्थापन कशा प्रकारे करावे लावडीसाठी फेब्रुवारी महिना उत्तम ठरतो कारण वेगाने वाहणारे  वारे  गारपीट पिकांवर होणारे विपरीत परिणाम.या सगळ्यांनचा विचार करून त्यांची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी.कारण यामुळे  केळी झाड वाढीसाठी हा काळ चांगला आहे.जास्त करून केळीच्या झाडावर पणामा रोग शेंडे झोका यांसारखे हानिकारक रोग केळीच्या झाडांना पडतात त्यामुळे त्याची अति काळजी घेणे गरजेचे आहे त्यानुसार औषध फवारणी वगैरे देणे गरजेचे आहे.

केळीच्या झाडांचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे?

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेती मध्ये पाच बाय पाच फुटाच्या अंतरावर खड्डे करून केळीच्या झाडांची लागवड योग्यरीतीने करावी.केळीच्या झाडाची कापणीस यायला एक वर्षाचा कालावधी हा लागतो.त्यामुळे जर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळीची लागवड केली तर पुढच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये केळी ची झाडे कापनिस येतात. केळीची लागवड करताना जवळपास दोन मीटर अंतरावर कडेने शेवरीच्या झाडांची लागवड म्हणजेच कुंपण करावी यामुळे येणारे वारे हे शेवरीच्या झाडांना अडून केळीच्या झाडांचे नुकसान होण्या पासून थांबवते.

हेही वाचा:चिंच प्रक्रिया उद्योग, यशाचा हमखास राजमार्ग

तसेच त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे फाटणारी पाने आणि उन्हाळ्यात उष्ण व हिवाळ्यात थंड असणारे वारे यामुळे केळीच्या झाडांचे संरक्षण होते. शेवरीच्या कुंपण केल्यामुळे केळीची झाडे व पाणी कोलमोडत नाहीत.केळी  लागवड  नंतर दोनशे  दहा  दिवसांनी नत्राची मात्रा प्रत्येक झाडाला अशा पद्धतीने युरिया मधून द्यावी. नेहमी काळजी घेऊन मशागत करून जमीन ही कायम भुसभुशीत ठेवावी. झाडांभोवती मातीचा योग्य त्या पद्धतीने आधार द्यावा.

केळीच्या झाडांना भरपूर पाणी लागते पण पाणी खोडा मध्ये साचून राहणार नाही याची काळजी घेतली  पाहिजे. तसेच पाण्याचे प्रमाण हे केळीचे झाडांच्या वाढीवर अवलंबून असावे. अतिकडक उन्हाळ्यात केळीच्या झाडांना पाच ते सहा दिवसांनी पाणी  देणे गरजेचे आहे. केळीच्या लागवडीचे एक पीक घेण्यास अठरा महिने लागते म्हणजेच अठरा महिन्यांमध्ये 45 ते 70 वेळा पाणी द्यावे लागते.

English Summary: Thus banana cultivation and management, will benefit one hundred percent
Published on: 21 June 2021, 05:39 IST