Agripedia

शेतकऱ्याचा परंपरागत पिकांच्या पाठीमागे न लागता नवनवीन पिकांचे प्रयोग शेतीत करीत आहेत. या नवीन पिकांच्या पर्यायांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती उत्तम प्रकारे शकते. या औषधी वनस्पतींचे लागवडीविषयी आणि बाजारपेठ याविषयी या लेखात माहिती घेऊ.

Updated on 22 October, 2021 9:42 AM IST

 शेतकऱ्याचा परंपरागत पिकांच्या पाठीमागे न लागता नवनवीन पिकांचे प्रयोग शेतीत करीत आहेत. या नवीन पिकांच्या पर्यायांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती उत्तम प्रकारे शकते. या औषधी वनस्पतींचे लागवडीविषयी आणि बाजारपेठ याविषयी या लेखात माहिती घेऊ.

अनेक कंपन्या करारावर अशी औषधी वनस्पतींची शेती करण्याची संधी देतात. औषधी वनस्पतींच्या शेतीचे व महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही शेती कमी खर्चात सुरू होते असे नाही तर यातून दीर्घकालीन काळासाठी निश्चित उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला शेतीचे क्षेत्रही कमी लागते आणि त्यासोबत गुंतवणूकहि कमी करावी लागते. या औषधी वनस्पतींचे लहान लहान स्वरूपात मळे तयार केले जातात व यांच्या लागवडीसाठी  साठी लागणारा खर्च पाहिला तर तो पंधरा हजार रुपयांपर्यंत येतो. परंतु या पासून मिळणारे उत्पादन हे लाखो मध्ये होते.अशा  काही औषधी वनस्पती आहे त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळू शकते. अशा वनस्पतींची माहिती बघू.

जागा कमी उत्पादन अधिक

 अशा औषधी वनस्पतींमध्ये तुळशी,आर्टेमिसिया, ज्येष्ठमध, कोरफड इत्यादी औषधी वनस्पती अगदी कमी वेळात तयार होतात. या

औषधी वनस्पती न करता शेती असावी असं काही नाही. तुम्ही अगदी लहान लहान कुंड्यांमध्ये ही या वनस्पती वाढवूशकतात.या वनस्पतींच्या लागवडीसाठी खर्च हा काही हजार रुपयांमध्ये येतो परंतु उत्पन्न काहीलाखोंच्या घरात येते. देशामध्ये अनेक औषध कंपन्या आहेत. अशा औषध कंपन्या पीक खरेदी करेपर्यंत करारकरतात. त्यामुळे अशा औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा धोका होत नाही व त्याची कमाई ही ठरलेलीच असते.

तुळस

 तुळशी वनस्पती आपल्याला सर्वांना माहिती आहे. तुळशी आणि धार्मिक गोष्टींशी जोडलेली आहे. तसेच तुळस मध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे तुळशीला वेगळे महत्त्व आहे. युजेनॉल आणि मीथायलंड सीनामेटला कारणीभूत असलेल्या तुळशीचे अनेक प्रकार आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारासाठी औषधे तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

तुळशीच्या एक हेक्टरवर लागवडीसाठी व देखभालीसाठी केवळ 15 हजार रुपये खर्च येतो. योग्य व्यवस्थापन आणि करारानुसार विक्री झाली तर या एक हेक्टर  मधून तीन लाखांपर्यंत याचे उत्पादन मिळू शकते.

प्रशिक्षण उपलब्ध

 या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. यातून फसवणूक होऊ नये याची काळजी देखील महत्त्वाचे आहे. लखनऊ येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स( सी एम ए पी ) या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रशिक्षण देते. सीएमएपी च्या माध्यमातूनच औषध कंपन्या हे तुमच्याशी संपर्क साधतात. त्यामुळे मार्केट शोधण्याची तुम्हाला आवश्यकता नाही.

English Summary: through medicinal plant cultivation can earn lakh rupees
Published on: 22 October 2021, 09:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)