राज्यात लांबलेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १५ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्या यंदा ३३ टक्क्यांनी पिछाडीवर आहेत. मात्र शेतकरी पावसाचा अंदाज घेत नियोजन करीत असल्यामुळे दुबार पेरण्यांची स्थिती अद्याप तरी उद्भवलेली नाही, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.१४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात खरिपाचा पेरा होतो. त्यात सोयाबीन, कापूस, धान, कडधान्ये ही मुख्य पिके आहेत. पुरेसा पाऊस नसल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या रखडलेल्या आहेत.
“२३ जूनपर्यंत राज्यात १५.३० लाख हेक्टरपर्यंत खरीप पेरण्या झाल्या आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत २३ लाख हेक्टरच्या पुढे पेरा झाला होता,” अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.जूनमध्ये आतापर्यंत सरासरी २०७ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. परंतु केवळ ४१ टक्के पाऊस झाला असून, तो ८५.६ मिलिमीटर आहे. सरासरीपेक्षाही सर्वात कमी पाऊस पुणे विभागात असून तो २६ टक्के आहे. औरंगाबाद व लातूर भागात मात्र ६५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. गेल्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही.
मात्र चालू आठवड्यात अनेक भागांत पेरण्यांपुरता पाऊस झालेला आहे. पावसाची वाटचाल पुढे व्यवस्थित चालू राहिल्यास १५ जुलैपर्यंत बहुतेक पेरण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या असतील, असा अंदाज कृषी विभाग व्यक्त करीत आहे.सोयाबीन, कपाशीची पेरणी सुरू : ७५ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यानंतर किंवा चांगला ओलावा पाहूनच पेरण्या कराव्यात, असा सल्ला कृषी विभागाने गेल्या आठवड्यात दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदम पेरण्या करण्याची घाई केलेली नाही. सोयाबीन व कपाशीचा पेरा काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे.
जूनमध्ये आतापर्यंत सरासरी २०७ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. परंतु केवळ ४१ टक्के पाऊस झाला असून, तो ८५.६ मिलिमीटर आहे. सरासरीपेक्षाही सर्वात कमी पाऊस पुणे विभागात असून तो २६ टक्के आहे. औरंगाबाद व लातूर भागात मात्र ६५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. गेल्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. मात्र चालू आठवड्यात अनेक भागांत पेरण्यांपुरता पाऊस झालेला आहे. पावसाची वाटचाल पुढे व्यवस्थित चालू राहिल्यास १५ जुलैपर्यंत बहुतेक पेरण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या असतील, असा अंदाज कृषी विभाग व्यक्त करीत आहे.
Published on: 01 July 2022, 07:05 IST