Agripedia

पिकामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या घटनेच्या संबंधित विद्राव्य खताची फवारणी केल्यासही खते प्रभावीपणे कार्यकरतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास जास्त फायदा होतो.

Updated on 02 February, 2022 9:00 AM IST

पिकामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या घटनेच्या संबंधित विद्राव्य खताची फवारणी केल्यासही खते प्रभावीपणे कार्यकरतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास जास्त फायदा होतो.

विद्राव्य खते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. या लेखात आपण काही प्रमुख विद्राव्य खतांची माहिती घेणार आहोत.

पीक व फळबागांसाठी उपयुक्त विद्राव्य खते

1-19:19:19,20:20:20- या विद्राव्य खतांनास्टार्टर ग्रेड म्हणतात. या खतांमध्ये नत्र अमाईड, अमोनीकलवनायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरुवातीचा अवस्थेत शाकीयवाढीसाठी होतो.

2-12:61:0- या खतास मोनो अमोनियम फॉस्पेट म्हणतात यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळाच्या तसेच जोमदार शाखीयवाढ, मुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादणासाठीत्यांचा उपयोग होतो.

3-0:52:38-या खतासमोनोपोटॅशियमफोस्पेटम्हणतात. यामध्ये स्फूरदव पालाशहीअंन्नद्रव्येभरपूर असतात. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हेखत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांचा योग्य पक्वतेसाठी तसेचसालीचाआकर्षक रंग साठी हे खत वापरले जाते.

4,13:0:45- या खताचा पोट्याशियम नायट्रेट म्हणतात. त्यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पलाशचेप्रमाण जास्तअसते. फुलोरा नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अण्णा निर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

5-13:40:13- कपाशीला पात्या,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीचे बोंडे वाहने पिकात शेंगांची संख्या वाढते.

6- कॅल्शियम नायट्रेट – मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटकहोण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात ठोंबेकिंवा शेंगा वाढीच्या अवस्थेतया  खतांचा वापरहोतो.

7-24:28:0- यामधील नत्र हा नायट्रेटवअमोनीकल स्वरूपातील आहे शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणाअवस्थेत त्याचा वापर करता येतो.

English Summary: this water soluble fertilizer is important for crop and fruit orchered
Published on: 02 February 2022, 09:00 IST