करडई हे महाराष्ट्र राज्याचे रब्बी हंगामातील महत्वाची तेलबिया पीक आहे. रब्बी हंगामामध्ये पाण्याचा ताण जरी पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते.
यामागचे प्रमुख कारण म्हणजे या पिकाच्या मुळ्या जमिनीमध्ये 140 ते 150 सेंटीमीटर खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. करडई तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलापेक्षा बरेच कमी असते.त्यामुळे हृदयरोग असलेल्या लोकांना हे तेल वापरणे फायदेशीर ठरते. तसेच शरीरामध्ये कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढू नये म्हणून इतर तेला सोबत या तेलाचा उपयोग करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे करडई त्याला बाजारात खूप मागणी असते. या लेखामध्ये आपण करडई पिकाच्या काही महत्त्वाच्या जातींची थोडक्यात माहिती घेऊ.
करडई पिकाच्या उत्पादनक्षम जाती(Veriety of safflower)-
- भीमा- हे वान कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य असून अवर्षण परस्थिती प्रतिकारक्षम आहे. इतकेच नाही तर मावा आणि पानावरील ठिपके रोगाला देखील मध्यम प्रतिकारक आहे. या वाणाची शिफारस महाराष्ट्र राज्यासाठी करण्यात आली आहे. हे वान 120 ते 130 दिवसांत काढणीस येते. यापासून हेक्टरी 12 ते 14 क्विंटल उत्पादन मिळते.
- फुले कुसुमा- हे वाण कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याच्या ठिकाणी योग्य आहे. हे वाणाची शिफारस ही अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी करण्यात आली आहे. हेवान 125 ते 140 दिवसांत काढणीस तयार होते.जिरायती क्षेत्रात हेक्टरी 12 ते 15 क्विंटल तर बागायतीक्षेत्रात 20 ते 22 क्विंटल उत्पादन मिळते.
- एस.एस.एफ-658 – एक बिगर काटेरी वान असून पाकळ्या साठी योग्य आहे.अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेले वान आहे.हे वाण 115 ते 120 दिवसांत काढणीस तयार होते वयापासून हेक्टरी 11 ते 13 क्विंटल उत्पादन मिळते.
- एस.एस.एफ-708-हेवान कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. मावा रोगास मध्यम प्रतिकारक असून महाराष्ट्र राज्य साठी लागवडीसाठी शिफारस केलेले आहे.हेवान 115 ते 120 दिवसांत काढणीस येते. जिरायती क्षेत्रात हेक्टरी 13 ते 16 क्विंटल तर बागायती क्षेत्रात हेक्टरी 20 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते.
- फुले करडई- हे वाण अधिक उत्पादनासाठी प्रसिद्ध असून पांढऱ्या फुलांचे काटेरी वाण आहे. मावा रोगास मध्यम प्रतिकारक असून अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस केलेली आहे.हेवान 120 ते 125 दिवसांत काढणीस तयार होते.हेक्टरी 13 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते.
- परभणी कुसुम- हे वाण मावा किडीस सहनशील असून मराठवाडा तसेच अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. हे वाण 135 ते 137 दिवसांत काढणीस येते व हेक्टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते.
- नारी 6- हे बिगर काटेरी वाण असून संरक्षण पाण्याखालील लागवडीसाठी योग्य आहे. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस केलेली आहे.हे काढणीस 130 ते 135 दिवसात तयार होते. यापासून हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते.
- फुले चंद्रभागा( एस एस एफ 748 )-हे वान कोरडवाहू आणि बागायतीसाठी उत्तम आहे. हे एकटे रीवा नसून मावा रोगास मध्यम प्रतिकारक आहे तसेच याची अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस आहे. 125 ते 140 दिवसांत काढणीस तयार होते व जिरायती क्षेत्रात हेक्टरी 13 ते 16 क्विंटल तर बागायती क्षेत्रात 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.
Published on: 25 February 2022, 01:33 IST