भारतातील जवळजवळ सर्वच राज्यात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भेंडीची लागवड होते.भेंडीला वर्षभर बाजारात चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून चांगले उत्पन्न मिळवता येते.
भेंडी ही औषधी गुणांनी युक्त आहे. भेंडी मध्ये अ, ब, क इत्यादी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असून फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम व सल्फर सारखी खनिज द्रव्ये ही भरपूर आहेत. या लेखामध्ये आपण उपयुक्त अशा या भेंडीच्या काही चांगल्या उत्पादनक्षम वाणाची माहिती घेणार आहोत.
भेंडीचे चांगले उत्पादनक्षम सर्वात्तम वाण
- पुसा सावनी- अभिजात भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात अनेक भागात या जातीची लागवड करण्यात येते. या जातीची भेंडी ही 10 ते 15 सेंटिमीटर लांब आणि हिरव्या रंगाचे असते. फळावर पाच शिरा असतात. या जातीच्या झाडावर काटेरी लव असते.खरीप आणि उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे. या जातीपासून हेक्टरी आठ ते दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते.
- परभणी क्रांती- मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे विकसित केली आहे. या जातीची फळे कोवळी हिरवी किंवा लांब असतात. फळांची लांबी आठ ते दहा सेंटिमीटर पर्यंत असते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात केवडा या रोगास बळी पडत नाही. या जातीला 40 ते 90 दिवसांत फुले येतात व 55 ते 60 दिवसात पहिला तोडा मिळतो. या जातीमधून हेक्टरी सात ते आठ टन उत्पादन मिळते.ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी उपयुक्त आहे.
- अर्का अनामिका- या जातीची झाडे उंच वाढतात वफळे लांब आणि खूप कोवळी असून त्यावर पाच ते सहा शिरा असतात. फळे रंगाने गर्द हिरवी असतात. फळांचा देठ लांब असतो. या जातीपासून हेक्टरी नऊ ते 12 टन उत्पादन मिळते. ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे.
- अंकुर 40- ही भेंडीचे सरळ वाढणारी जात असून पेरामधील अंतर कमी असते. या जातीची फळे हिरव्या रंगाचे असतात व या जातीपासून हेक्टरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते.
- महिको-10- ही जात जास्त लोकप्रिय आहे. या जातीची फळे गडद हिरव्या रंगाची असतात. या जातीपासून हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
- वर्षा- ही जात सुद्धा जास्त लोकप्रिय आहे. या जातीची फळे 5 ते 7 सेंटीमीटर लांबीची असून फळांचा रंग हिरवा असतो व फळे लुसलुशीत असतात. फळे तोडल्यावर काळी पळत नाही.या जातीपासून हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
Published on: 21 October 2021, 01:53 IST