Agripedia

Crop Variety :- महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड केली जाते. हे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांसाठी देखील आर्थिक दृष्टिकोनातून हे पीक महत्त्वपूर्ण आहे. ह्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता व्यवस्थापनाच्या सोबतच पिकांची व्हरायटी म्हणजेच वाण दर्जेदार असतो खूप गरजेचे असते. वाण जर दर्जेदार असेल तर मिळणारे उत्पादन देखील भरघोस स्वरूपाचे मिळते.

Updated on 22 August, 2023 9:50 AM IST

Crop Variety :- महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड केली जाते. हे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांसाठी देखील आर्थिक दृष्टिकोनातून हे पीक महत्त्वपूर्ण आहे. ह्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता व्यवस्थापनाच्या सोबतच पिकांची व्हरायटी म्हणजेच वाण दर्जेदार असतो खूप गरजेचे असते. वाण जर दर्जेदार असेल तर मिळणारे उत्पादन देखील भरघोस स्वरूपाचे मिळते.

या नवनवीन आणि दर्जेदार वानांच्या विकासामध्ये देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन संस्थांचा मोलाचा सहभाग असतो. अगदी याच दृष्टिकोनातून राज्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे जे काही शिरगाव येथील भात संशोधन केंद्र आहे या संशोधन केंद्राने रत्नागिरी 8 या जातीची संशोधित केलेली भाताच्या जातीच्या लागवडीकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतो. नेमकी रत्नागिरी 8 म्हणजे सुवर्णा-मसुरा या वाणाची कोणती वैशिष्ट्य आहेत? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहित घेऊ.

 रत्नागिरी 8 या वाणाची वैशिष्ट्ये

 सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा वाण चवीला उत्तम असून याचा दाणा हा मध्यम बारीक असतो. साधारणपणे लागवडीनंतर 135 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. रत्नागिरी तालुक्यात असलेल्या शिरगाव भात संशोधन केंद्राच्या माध्यमातून हा वाण 2019 मध्ये विकसित करण्यात आलेला आहे. फार कमी कालावधीमध्ये या वानाने सिंधुदुर्ग तसेच पालघर व ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

. एवढेच नाही तर विदर्भात देखील या वाणाला चांगली मागणी दिसून येते. महाराष्ट्र व्यतिरिक्त बिहार आणि आंध्र प्रदेश, छत्तीसगड तसेच तेलंगणा या राज्यांमधून देखील या वाणाला चांगली पसंती मिळत आहे. या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे बदलत्या हवामानामध्ये देखील हा वान चांगला टिकणारा असून उशिरा पाऊस जरी पडला तरी याला फटका बसत नाही. लागवडीनंतर साधारणपणे 135 ते 140 दिवसांमध्ये हे पीक तयार होते. 

या वाणाच्या पिकाची कापणी जर वेळेवर केली तर तांदळाचा तुकडा होण्याचे प्रमाण देखील कमी असते. तसेच उंचीला मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही. करपा किंवा कडा करपा या रोगांना चांगला प्रतिकारक असून वेळेवर पेरणी व लागवड केल्यास किडींचा प्रादुर्भाव देखील अत्यल्प प्रमाणात होतो. अशा अनेक कारणांमुळे हा वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

English Summary: This variety of rice is becoming popular with farmers how is this variety beneficial for farmers
Published on: 22 August 2023, 09:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)