चोपण जमीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या जमिनींचे वैशिष्ट्ये आपल्याला चांगली माहिती आहे. या जमिनीमध्ये इतका ओलावा असतो की कधी कधी लावलेले उगवत देखील नाही. पिके उगवण्यासाठी शेतकरी भरपूर काही तरी प्रयत्न करतात.
या जमिनीचा सामू नियंत्रित ठेवण्यासाठी काही शेतकरी जमिनीत ऍसिड टाकतात. परंतु याने जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणू मृत्यू पावतात.
किंवा काही शेतकरी बाहेरून चांगली माती आणून त्या मातीत बियाणे लागवड करतात. परंतु या सगळ्या उपायांमुळे खर्चात अतिरिक्त वाढ होते. या लेखामध्ये आपण चोपण जमिनीची सुधारणा कशा पद्धतीने करावी याबद्दल जाणून घेऊ.
चोपण जमिनीचे आरोग्य सुधारणे
1- चोपण जमिनीला एक टक्का उतार देऊन योग्य अंतरावर चर काढावेत.
2- शक्य असेल तर जमिनीखाली सच्छिद्र पाइप टाकून पाण्याचा भूमिगत निचरा करावा.
3- जमिनीत सछिद्र पाईप टाकल्यानंतर त्यातून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी जमिनीचा उतार योग्य ठेवावा.
नक्की वाचा:शेतीतून अधिक उत्पन्न येण्यासाठी अशी करावी शेतीची पूर्व तयारी
4- त्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करून जिप्सम आठ ते दहा टन प्रति हेक्टरी शेणखतामध्ये मिक्स करून जमिनीत टाकावे.
5- अशा जमिनीत कोणतेही पीक घेत असताना सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा.
6-पिकांची जेव्हा फेरपालट कराल तेव्हा ते करत असताना धैचा जमिनीत गाडावा.
7- मातीचे परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करावे.

Published on: 17 June 2022, 08:18 IST