Agripedia

कांदा पिकाचे उत्पादन महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात घेतली जाते. कांदा हे पीक हवामानाला फारच संवेदनशील असून हवामानात झालेला बदल कांद्याला जास्त प्रमाणात मानवत नाही. कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. या लेखात आपण काळा करपा आणि पांढरी सड या रोगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 03 March, 2022 1:41 PM IST

कांदा पिकाचे उत्पादन महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात घेतली जाते. कांदा हे पीक हवामानाला फारच संवेदनशील असून हवामानात झालेला बदल कांद्याला जास्त प्रमाणात मानवत नाही. कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. या लेखात आपण काळा करपा आणि पांढरी सड या रोगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

  • कांदा पिकावरील काळा करपा :-

 महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचे लक्षणे.

  • सुरुवातीला या रोगामध्ये पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडक्या जवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकारआणि उबदार ठिपके वाढू लागतात.
  • कालांतराने या टक्क्याचेप्रमाण वाढत जाते व पाने वाळतात.
  • पानेवाळण्याचे प्रमाण वाढल्याने कांद्याची वाढ होत नाही.
  • पानावरील चट्टे जवळून बघितल्यास काळ्या टिपक्या च्या मधला भाग पांढऱ्या रंगाचा असून त्या भोवती गोलाकार काळे पट्टे असल्याचे दिसते.
  • हा रोग खरिपातील रोपवाटिकेतील रोपांवर देखील येतो. त्यामुळे रोपांची पाने काळी पडून वाळतात. नंतर रोप मरते.
  • या रोगास प्रतिकूल स्थिती
  • खरीप हंगामातील दमट आणि उबदार हवामानात या रोगाच्या बुरशीचीवाढ झपाट्याने होते.
  • या रोगाची बुरशी या पावसाच्या थेंबाने मार्फत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरते मुख्य म्हणजे रोपवाटिकेच्या माध्यमातून हा रोगशेतातयेतो.
  • जमिनीतून पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण आणिसतत  रिमझिम पडणारा पाऊस यामुळेया रोगाचे प्रमाण वाढते.कांद्याच्या माना लांब होतात. व कांदा काही प्रमाणात तयार झाल्यानंतर रोगाचे प्रमाण वाढले तर पाने वाळतात व कांदा पोसत नाही.
  • कांदा पिकावरील पांढरे सड :-

 या रोगामुळे कांदा पिकाचे जवळजवळ 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते.

  • पांढरे सडया रोगाची लक्षणे :-
  • ही बुरशी पुनर्लागण केलेल्या रोपाच्या मूळावर वाढते.
  • या रोगात रोपाची किंवा झाडाची पाने जमिनीलगत सडतात व पानाचा वरचा भाग पिवळा पडतो.
  • या रोगामध्ये जुनी पाने प्रथम बळी पडतात.
  • रोगाच्यातीव्रतेमुळे पानेजमिनीवर लोळतात.
  • कांद्याची मुळे सडल्यामुळे कांद्याचे झाड सहज उपटूनयेते.
  • वाढलेल्या कांद्याला मुळे राहत नाहीत.
  • कांद्यावर कापसासारखे पांढरी बुरशीवाढते व त्यावर पांढरे दाणे तयार होतात व कांदा सडतो.
  • पांढऱ्या सडीच्या प्रादुर्भाव पुनर्लागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही.
  • या रोगास पोषक स्थिती :-
  • खरीप आणि रब्बी हंगामात या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
  • पाण्याचा निचरा चांगल्या न होणाऱ्या शेतात या रोगाचीतीव्रताअधिक असते.
  • या रोगाची बुरशी जमिनीत बरेच वर्ष टिकते.
  • उपाय :-
  • माय रोग होऊ नये म्हणून जे उपाय केले जातात त्यामुळे हा रोग टाळता येतो.
  • एका शेतात वर्षानुवर्ष कांद्याची लागवड करू नये.
  • कांद्याचे तृणधान्य सोबत फेरपालट करावी.
  • खरिपाची लागवड नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.
  • उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
  • कांद्याच्या पुनर लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिम द्रावणात 1 ते 2 मिनिटे बुडवून घ्यावी. त्यासाठी 20 ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
English Summary: this two disease in onion crop is so harmful give information about that
Published on: 03 March 2022, 01:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)