Agripedia

हळद (Turmeric) ही भारतीय स्वयंपाकघरातील अशी वस्तू आहे जिच्याविना जवळपास कुठलीच भाजी ही बनवता येत नाही, हळदीचे हे महत्व लक्षात घेता हळदीला खुप मोठे मार्केट भारतात उपलब्ध आहे हे आपल्याला समजतच. हळद स्वयंपकाव्यतिरिक्तही उपयोगात आणली जाते, हो हळद ही एक औषधी वनस्पती (Medicinal Plant) देखील आहे. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात हळदीचे सेवन केल्याने अनेक रोग बरे होतात.

Updated on 21 September, 2021 2:12 PM IST

हळद (Turmeric) ही भारतीय स्वयंपाकघरातील अशी वस्तू आहे जिच्याविना जवळपास कुठलीच भाजी ही बनवता येत नाही, हळदीचे हे महत्व लक्षात घेता हळदीला खुप मोठे मार्केट भारतात उपलब्ध आहे हे आपल्याला समजतच. हळद स्वयंपकाव्यतिरिक्तही उपयोगात आणली जाते, हो हळद ही एक औषधी वनस्पती (Medicinal Plant) देखील आहे. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात हळदीचे सेवन केल्याने अनेक रोग बरे होतात.

एवढेच नाही तर हळद ही आपल्या बळीराजासाठी (Farmers) देखील खुप फायद्याची आहे आणि हळदीची लागवड करून शेतकरी नक्कीच लखपती बनू शकतात. अलीकडे हळदीची लागवड (Turmeric Cultivation) शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. केरळ येथे स्थित भारतीय मसाले संशोधन संस्था, कोझिकोड, यांनी हळदीची एक वाण विकसित केली आहे आणि ही हळदीची वाण शेतकऱ्यांना चांगला नफा देत आहे. ही जातं ह्या संस्थेने 1996 मध्ये तयार केली होती. हळदीची ही विशेष वाण म्हणजेच प्रतिभा ही होय, ह्या जातीच्या हळदीचे पीक कमी वेळात परिपक्व होते. या लेखात हळदीच्या ह्या विशेष जातीबद्दल जाणून घेऊया.

प्रतिभा जातीच्या हळदीची विशेषता नेमकी काय आहे बरं

भारतीय मसाले संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषी अर्थशास्त्र) डॉ. लीजो थॉमस यांनी कृषी जागरणशी बोलताना सांगितले की हळदीच्या इतर जातींच्या तुलनेत खूपच चांगली आहे ह्या जातीत हळद सडण्याची समस्या ही नगण्यच आहे. एवढेच नाही तर ही जातं केवळ 225 दिवसात तयार होते. इतर जातींच्या तुलनेत ह्यामध्ये कर्क्युमिन अधिक आढळते जवळपास 6.52 टक्क्यांपर्यंत कर्क्युमिन असते.  ह्या जातीत, ओलेओरेसिनचे प्रमाण 16.2 टक्के, आणि आवश्यक तेलाचे प्रमाण 6.2 टक्के पर्यंत आढळते. ह्या जातीच्या हळदीच्या रोपट्याची उंची 42.9 सेमी पर्यंत आहे. आणि विशेष म्हणजे, ह्या जातीच्या हळदीचे रायझोंम फायबरने समृद्ध,जाड आणि ठळक असतात.

कर्क्युमिन काय असतो जाणुन घ्या

हळदीच्या विविध जातींमध्ये 2 ते 6 टक्के कर्क्यूमिन आढळते, जे नैसर्गिकरित्या येते.  आपल्या डोळ्याला जो हळदीचा रंग दिसतो आणि जी हळदीला थोडीशी तिखट चव येते हे होते त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्क्युमिनमुळे. यामुळे हळद वैद्यकीयदृष्ट्या खुप फायदेशीर बनते. हळदीत आढळणाऱ्या ह्याच घटकमुळे  हळद ही विविध रोगांमध्ये फायदेशीर ठरत आहे.

 

देशात जवळपास सर्वत्र लागवड करता येईल

डॉ थॉमस यांनी सांगितले की, हळदीची ही एक प्रगत वाण आहे, जी कमी वेळेत उत्पादन देण्यास तयार होते. ह्याची लागवड खरीप हंगामात जून-जुलै ह्या महिन्यात करता येते.  

ह्याची लागवड ही पाण्याची पुरेशी व्यवस्था असल्यास लवकर पण करता येते म्हणजेच मे-जूनमध्ये करता येते. ते म्हणाले की प्रतिभा जातीची लागवड आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळसह देशातील इतर राज्यांमध्ये करता येते. हळदीच्या या जातीपासून प्रति हेक्टर जवळपास 39 ते 52 टन उत्पादन घेता येते.

English Summary: this turmeric veriety cultivate in everywhere
Published on: 21 September 2021, 02:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)