फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात नवीन गहू बाजारात येतात आणि गृहिणींची गहू साठवण्याची लंगबाबग सुरू होते. जवळपास सर्वच मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू घरात साठवणूक करतो परंतु अनेकदा योग्य साठवण अभावी गहू धान्याला कीड लागते आणि मोठे नुकसान होते.
तेव्हा वेळीच काळजी घेतल्यास हे नुकसान टाळता येते. आज या लेखात आपण जाणून घेऊया साठवणूक करीत असलेल्या गव्हाला कीड न लागावी म्हणून कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती घेऊ.
प्रथम गव्हाला किडीची लागण कशामुळे होते ते जाणून घेऊया.
गव्हाला कीड लागण्याचे प्रमुख कारणे
प्रामुख्याने गव्हात जर आद्रतेचे प्रमाण जास्त असेल तर अशा गव्हाला लवकर लागते. म्हणून गहू बाजारातून आणल्यावर दोन ते तीन दिवस कडक उन्हात चांगले वाळत घालावे, त्यामुळे गव्हातील आद्रता पूर्ण नष्ट होईल व कीड लागण्याची शक्यता कमी होईल.
गहू या धान्याला कीड लागण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आद्रता होय, वातावरणातील आद्रता गहू धान्य लवकर शोसून घेते त्यामुळे गव्हाला इतर धान्याच्याप्रमाणात लवकर कीड लागते. आपण सर्वांनी अनुभवले असेल की एखाद्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असेल तर चीड लागण्याच्या प्रमाणात नेहमीप्रमाणे अधिक प्रमाण असते. कारण त्या वर्षात झालेल्या अधिक च्या पावसाने वातावरणात आद्रतेचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे कीड लवकर लागते. म्हणून गहू साठवणूक करण्यापूर्वी खालील गोष्टींची काळजी घ्या.
1) यात सर्वप्रथम गहू साठवणूक करण्यासाठी ओलावा मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करावी.
2) गहू साठवण्यासाठी लोखंडी पत्र्यापासून किंवा सिमेंट पासून बनवलेल्या सुधारित कोठीचा वापर करावा. असे केल्याने धान्य साठवणुकीच्या कोठीला कीड उंदीर आणि ओलाव्यापासून आपल्याला संरक्षण करता येते.
नक्की वाचा:रोजगार हमी योजना आहे हाताला काम देणारी योजना, परंतु ही आहे या योजनेची वास्तविक स्थिती
3) गहू या धान्याला सोंनकिडीचा प्रामुख्याने लागण होते म्हणून धान्य साठवणुकीच्या कोठीत कडू लिंबाचे पाने टाकावीत धान्याला कीड पासून वाचवण्यासाठी हे एक पारंपारिक संरक्षणाची पद्धत आहे.
4) याशिवाय बाजारात बोरिक ऍसिड मिळते एक क्विंटल गव्हासाठी 400 ग्रॅम बोरिक एसिड पावडर टाकावी.
5) याशिवाय बाजारात इथिलीन डाय क्लोराईड व कार्बन टेट्रॉक्लोराईड हे घटक असले एक अमप्युल मिळते ते गहू साठवणूक करण्याच्या कोठीत सोडावे.
6) गव्हातील आद्रता नष्ट करण्यासाठी वर्तमानपत्रातील कागदाचे तुकडे टाकल्याने फायदा होतो. हे कागदाचे तुकडे धान्यातील आद्रता कमी करण्यास मदत करतात.
7) गहू साठवणुकीसाठी धातूची कोठी जर आपल्याकडे नसेल तर पोती स्वच्छ व साफ करून त्यात गहू भरावेत व पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या कागदावर ठेवावेत. असे केल्याने गव्हाचे जमिनीवरील ओलाव्यापासून संरक्षण होते.
8) पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने पोती पॉलिथिनच्या कागदावर झाकून ठेवावेत जेणेकरून धान्य सुरक्षित राहण्यास मदत होईल.
9) बाजारात पोत्याच्या आकाराच्या पॉलिथिनच्या पिशव्या मिळतात अशा पिशव्या पोत्यात घालून नंतर त्यात धान्य भरले तर धान्य अधिक काळ सुरक्षित राहील अशाप्रकारे आपण गव्हाची साठवणूक केली तर गव्हाला कधीच कीड लागणार नाही.
( संदर्भ-marathifirst. com)
Published on: 20 March 2022, 09:29 IST