Agripedia

टोमॅटो शेड्युल नियोजन :- 1) बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रीएन्टस चा वापर करावा.DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्री एन्टस टाळावे 2) बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे. 3) लागवडीच्या चार ते पाच दिवसात पहिली ड्रेचिगं पोटॅशियम ह्युमिक किंवा हुमिक एसिड ची केल्यास रोपांच्या मुळांना चालना मिळते.

Updated on 16 February, 2022 5:14 PM IST
AddThis Website Tools

टोमॅटो शेड्युल नियोजन :-

  • बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रीएन्टस चा वापर करावा.DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्री एन्टस टाळावे
  • बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे.
  • लागवडीच्या चार ते पाच दिवसात पहिली ड्रेचिगं पोटॅशियम ह्युमिक किंवा हुमिक एसिड ची केल्यास रोपांच्या मुळांना चालना मिळते.
  • वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये.
  • फुले धरण्याच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे.
  • तोडे चालू झाल्यास 00:52:34, पोटॅशियम सोनेट,13:40:13, आणि 00:00:50 आलटून-पालटून वापरावे.
  • फुल धारणे पासून कॅल्शियम नायट्रेट दर 10 ते 12 दिवसांनी द्यायचा. कॅल्शियमची कमतरता असल्यास फळांच्या बुडाला काळा डाग येत असतो.
  • कॅल्शियम दिल्यानंतर पुढच्या पाण्यात बोरान नक्की देणे तसे केल्यास कॅल्शिअम अपटेक मध्ये पण मदत होते व फुल गळ पण थांबते.
  • मॅग्नेशियम दर 10 ते 12 दिवसांनी दिल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढतेआणि पानातील हिरवेगार पणा मध्ये पण वाढ होते.
  • दर 10 ते 15 दिवसांनी ह्युमिक ऍसिड किंवा मायकोरायझा ( रॅली गोल्ड किंवा इस बी एन किंवा VAM) सोडल्यास पांढऱ्या मुळींची चांगली वाढ होते.
  • दर अमावस्या ला एक किलो प्रती एकर निमास्टीन + 1 किलो गुळ रात्रभर भिजत ठेवून दुसर्‍या दिवशी ड्रिप मध्ये द्यावे, त्याने निमा तोडवर चांगले नियंत्रण मिळते.
  • लागवडीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिल्लस अल्टुं पालटून दर आठवड्याला देत राहिले तर सर्व बुरशीपासून चांगले संरक्षण मिळते व फवारणीचा खर्च पण चांगल्या मोठ्या प्रमाणात वाचतो. ही पद्धत अवलंबत असाल तर ड्रिप मधून बुरशीनाशक देणे टाळावे.
  • मिक्स मायक्रोन्यूट्रीएन्ट वर दहा ते पंधरा दिवसांनी द्यावे.
  • भुरी चे स्पोरजाळण्यासाठी m45 व चांगल्या प्रतीचे फास्फोरिक ऍसिड ची फवारणी केल्यास उत्तम नियंत्रण मिळेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवल्यास हवा खेळती राहून करपा आणि अळीचाप्रादुर्भाव कमी होतो.
  • झाडात पोटॅशचे प्रमाण व्यवस्थित असल्यासभुरी चा प्रादुर्भाव कमी होतो व लाल कोळी असल्यास नियंत्रण सोपे जाते.
  • फुल गळ थांबवायचे असल्यास ड्रिप मधून स्फुरद द्यावे आणि फवारणी मध्ये चिलेटेड कॅल्शियम व बोरान चा वापर करावा.
  • टोमॅटोमध्ये शेंडा खुडणी ( टॉपिंग) टाळावे. ते केल्यास वायरस वाढायची शक्यता जास्त होते.
  • व्हायरस चे लक्षण दिसतात वायरस च्या औषधांसोबत ताकवापरावे. ताकातील प्रोटीन व्हायरस सोबत मिक्स होऊन त्यांची उत्पत्ती नियंत्रणात येते.( संदर्भ- कृषी न्यूज )
English Summary: this tommato crop shedule planning important for more production
Published on: 16 February 2022, 05:14 IST