Agripedia

सध्या टोमॅटो हा चांगलाच चर्चेत आहे याचे कारण म्हणजे टोमॅटोचा वाढता भाव. त्यामुळे शेतकरी राजा देखील ह्यांच्या लागवडीविषयी साहजिकच जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहेत. हिच उत्सुकता आम्ही जाणुन आहोत, म्हणुनच कृषी जागरण आज टोमॅटो लागवडीविषयी महत्वपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आले आहे.

Updated on 24 November, 2021 7:14 PM IST

सध्या टोमॅटो हा चांगलाच चर्चेत आहे याचे कारण म्हणजे टोमॅटोचा वाढता भाव. त्यामुळे शेतकरी राजा देखील ह्यांच्या लागवडीविषयी साहजिकच जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहेत. हिच उत्सुकता आम्ही जाणुन आहोत, म्हणुनच कृषी जागरण आज टोमॅटो लागवडीविषयी महत्वपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आले आहे.

टोमॅटो हे एक महत्वाचे भाजीपाला पिक आहे, याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. टोमॅटो हे भाजीसाठी वापरतात, चटणी केली जाते, सलाद म्हणून कच्चे खाल्ले जाते, सौस बनवले जाते, इत्यादी ठिकाणी टोमॅटोचा उपयोग होतो. त्यामुळे टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि यातून शेतकरी बांधव चांगली कमाई देखील करतात.

 टोमॅटो लागवड करायची असेल तर खालील बाबी लक्षात घ्या

»शेतकरी राजानो टोमॅटो पिकाची लागवड हि संपूर्ण वर्षभर केली जाऊ शकते. परंतु असे असले तरी याची लागवड हि प्रदेशानुसार वेगवेगळ्या वेळी केली जाते.

»उत्तर भारतात टोमॅटो लागवड हि प्रामुख्याने जुलै ते ऑगस्ट आणि वसंत ऋतुत केली जाते. आणि वैज्ञानिक देखील ह्याच काळात लागवड करण्याचा सल्ला देतात.

»तसेच नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या काळात उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवड केली जाते. आणि यातून चांगले उत्पादन देखील मिळते.

»टोमॅटो लागवड करण्यासाठी योग्य जमीन निवडणे फार महत्वाचे आहे, याची लागवड हि वाळूयुक्त चिकनमातीत केली जाऊ शकते मात्र जमीन हि पाण्याचा चांगला निचरा होणारी हवी.

»ज्या जमिनीत टोमॅटो लागवड करायची आहे त्या जमिनीचा अर्थात मातीचा पीएच म्हणजेच सामू हा 6 ते 7 दरम्यान योग्य असल्याचे सांगितलं जाते. अशा जमिनीत टोमॅटो लागवड करून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते.

»टोमॅटो लागवड करण्याआधी सर्वात महत्वाचे काम म्हणजे जमिनीची पूर्वमशागत यासाठी आपण आधी जमीन चांगली देशी नागराने नांगरून घ्यावी, नंतर कल्टिव्हेटर मारून घ्यावे, जमीन भुसभूशीत करावी आणि शेत समतल करावे, त्यानंतर टोमॅटोची रोपे लावावीत.

टोमॅटोच्या काही सुधारित जाती

शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकातून जास्तीचे उत्पादन प्राप्त करण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित जातीची लागवड करणे गरजेचे असते, त्यामुळं टोमॅटो पिकातून खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्या चांगल्या सुधारित जातीची लागवड करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणुन घ्या टोमॅटोच्या काही सुधारित वाणा

 

1)अर्का सौरभ,              2)ए आर टी एच 3,

3)ए आर टी एच 4,        4)अविनाश 2,

5)बी एस एस 90,          6)को. 3,

7)एच एस 101,            8)एच एम 102,

9)एच एस 110,            10)सिलेक्शन 12

11) हिसार अनमोल (एच 24 )

English Summary: this tommato crop cultivation process is benificial for more production
Published on: 24 November 2021, 07:14 IST