मिरची ही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यासोबतच ते एक उत्तम व्यापारी पीक आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व घरातील लोकांचे मिरची शिवाय चालत नाही. बाजारात हिरव्या आणि वाळलेल्या लाल मिरचीचे वर्षभर मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
भारतामध्ये मिरची लागवड सर्व राज्यातून कमी अधिक प्रमाणात केली जाते देशातील एकूण क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्र आणि 75 टक्के उत्पादन आंध्र प्रदेश,महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात केंद्रित झाले आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर नासिक, अहमदनगर, जळगाव, धुळे,नंदुरबार इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली जाते. या लेखात आपण मिरचीच्या तीन महत्त्वाच्या जातींबद्दल माहिती घेऊ.
मिरचीच्या महत्त्वाच्या सुधारित जाती
अग्निरेखा- मिरचीची ही जात सन 1992 मध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.ही जात दोंडाईचा आणि ज्वाला यांच्या संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे.या जातीची झाडे मध्यम उंचीचे असतात.उन्हाळी आणि खरीप हंगामातील लागवडीसाठी उपयुक्त अशी ही जात आहे. तसेच हिरव्या फळासाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. वाळलेल्या लाल मिरची चा उतारा कमी मिळतो.मिरची ची लांबी दहा ते बारा सेंटीमीटर असूनजाडी ही एक सेंटीमीटर आहे.
- पिकलेल्या मिरचीचा रंग लाल भडक असतो आणि हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा असतो.या जातीपासून हेक्टरी 100 ते 120 क्विंटल उत्पादन मिळते तर वाळलेल्या मिरचीचे हेक्टरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.भुरी आणि मर रोगाला सहजासहजी ही जात बळी पडत नाही.या जातीच्या फळांना स्थानिक व शहरी बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळतो.
फुले ज्योती- फुले ज्योती ही जात 1995 साली निवड पद्धतीने प्रसारित केली आहे. या जातीची झाडे मध्यम उंचीची आणि पसरणारी असतात. जमिनीपासून तीन ते चार फांद्या फुटतात. पाने गिरवी आणि आकाराने मोठी असतात तसेच मिरची हि गोसात लागते.
- एका घोसात सरासरी चार ते पाच मिरच्या असतात. सर्व फळे एकसारखी वाढतात आणि एकाच वेळी काढणीस तयार होतात. मिरची ची लांबी सहा ते सात सेंटिमीटर असते तर जाडी 0.8 ते एक सेंटिमीटर असते.फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून तो चांगला टिकतो. रोपांच्या लागवडीनंतर 55 ते 60 दिवसात हिरव्या मिरचीचा तोडा मिळतो. तर पिकलेल्या मिरचीचा पहिला तोडा 80 ते 90 दिवसात मिळतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 180 ते 225 क्विंटल मिळते. ही जात भुरी रोगाला कमी बळी पडते तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे.
- फुले सई- ही जात विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्र, गडहिंग्लज येथून 1996 साल विकसित केली असून या जातीची पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत सी 1 आणि कमंडलू या दोन वानांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीच्या मिरच्या गर्द हिरव्या रंगाच्या असून वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असतो. फळे सात ते आठ सेंटिमीटर लांब असतात.झाड मध्यम उंचीचे असते तसेच कोरडवाहू क्षेत्रात 13 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन येते.
Published on: 30 January 2022, 06:58 IST