बदलत्या काळानुसार शेती पद्धती मध्येही विविध प्रकारचे बदल पाहायला मिळत आहेत. पारंपरिक शेती पद्धती मधून शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी नीलेश घोटेकर यांनी नवीन तंत्रानुसार एक एकर मध्ये लाल कांद्याची पेरणी केली आहे. निव्वळ कांद्याची पेरणी नाही तर या पेरणी यंत्राच्या साह्याने कोथिंबीर,मेथी, गाजर या पिकांची पेरणी करता येणार आहे. या लेखात आपण या यंत्र विषयी माहिती घेऊ.
या पेरणी यंत्राची माहिती
कांदा हे चार महिन्याचे पीक आहे. आपल्याकडे कांद्याचे लागवड ही आगोदर बियाण्याची लागवड रोपवाटिकेच्या माध्यमातून केली जाते. नंतर दोन महिन्यांनी रोपलागवडीला येते. त्यामुळे कांदा पिकाचा कालावधी हा सहा महिन्याचा होतो. कांदा पिकाचा विचार केला तर हे एक नगदी पीक आहे. बाजारपेठेत सर्वात आगोदर आवक झाली तर चांगले दर मिळतात. त्यामुळे यंत्राच्या साहाय्याने पेरणी झाली तर लवकर उगवण होऊन लवकर उत्पादन पदरी पडते.
पण अजूनही कांद्याची लागवड ग्रामीण भागात रोप लावूनच लागवड केली जाते. खेडले येथील शेतकऱ्यांनी नवीन पेरणी यंत्र घेतल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
या पेरणी यंत्राचा फायदा
कांद्याचे प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वी अगोदर बियाण्याच्या माध्यमातून रोपतयार करावे लागते. त्यावर वातावरणाचा परिणाम होऊन रोगराईचा धोका निर्माण होतो आणि यामध्ये नुकसान झाले तर शेतकऱ्यांना किलोमागे दोन हजार पाचशे रुपयांचे नुकसान होते.
तसेच पुढील दोन महिने त्या कांद्याच्या रोपाची जोपासना करावी लागते. मात्र पेरणी या पद्धतीने थेट कांदा पिकावर शेतकऱ्यांना लक्ष केंद्रित करता येते. तसेच लागवडीसाठी लागणारी मजुरांचा खर्चही वाचतो. लागवडीसाठी आधीच मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजूर टंचाईमुळे कांद्याचे लागवड रखडते. त्यामुळे कमी वेळात कांद्याच्या उत्पादनासाठी पेरणी यंत्र महत्त्वाचे आहे.
Published on: 27 October 2021, 09:07 IST